Bihar Election | एमआयएमच्या बिहारमधील वाढत्या ताकदीमुळे महाआघाडीची चिंता वाढणार

एआयएमआयएमची बिहारमधील सीमांचल भागातील वाढती ताकद काँग्रेस आणि राजद यांच्या नेतृत्वातील महाआघाडीसाठी चितांजनक ठरणार आहे. (AIMIM increasing power raised tension for Congress and RJD)

Bihar Election | एमआयएमच्या बिहारमधील वाढत्या ताकदीमुळे महाआघाडीची चिंता वाढणार
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 8:13 PM

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होत आहे.  एमआयएमची बिहारमधील वाढती ताकद काँग्रेस आणि राजद यांच्या नेतृत्वातील महाआघाडीसाठी चितांजनक ठरणार आहे. एमआयएमची बिहारच्या सीमांचल भागातील चार जिल्ह्यात ताकद वाढली आहे. मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमने विजय मिळवला होता. (AIMIM increasing power raised tension for Congress and RJD)

बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृ्त्वातील ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी आहे. एमआयएमची वाढती ताकद राजद आणि काँग्रेससाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

सीमांचल मध्ये एमआयएमची ताकद वाढली आहे. पश्चिम बंगालच्या सीमेजवळ असणाऱ्या किशनगंज, पूर्णिया, कटिहार आणि अररिया या 4 जिल्ह्यांमध्ये एमआयएमची ताकद वाढली आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी 24 जागांवर एमआयएम रिंगणात आहे. सीमांचलमध्ये एमआयएमची ताकद वाढली आहे. किशनगंज मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एमआयएमने विजय मिळवत ताकद दाखवून दिली.

किशनगंज, पूर्णिया, कटिहार आणि अररिया या चार जिल्ह्यांमध्ये मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने आहेत. राजद आणि काँग्रेसला या भागातून यश मिळायचे. मात्र, यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलण्याची शक्यता आहे. पूर्णिया जिल्ह्यात 35 टक्के, कटिहारमध्ये 45, अररिया 51 आणि किशनगंज मध्ये 70 टक्के मुस्लीम मतदार आहेत.

रादजला मोठा फटका बसण्याची शक्यता

सीमांचलमधील 4 जिल्ह्यांमध्ये एमआयएम जितक्या जागांवर विजय मिळवेल तितका फटका राजदला बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जदयुसमोर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने आव्हान उभे केले आहे.

चिराग पासवान यांनी जिथे लोक जनशक्ती पार्टीचा उमेदवार नाही तिथे भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे नितीश कुमार यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Saamana Editorial | बिहार भारतात, इतर राज्ये पाकिस्तानात आहेत का?, शिवसेनेची टीका

19 लाख 10 लाखापेक्षा मोठे की छोटे? चिदंबरम यांचा बिहारमधील नोकऱ्यांवरुन भाजपला सवाल

(AIMIM increasing power raised tension for Congress and RJD)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.