रेल्वेच्या 13 हजार पदांसाठी भरती सुरु, 31 जानेवारीपर्यंत मुदत

रेल्वेच्या 13 हजार पदांसाठी भरती सुरु, 31 जानेवारीपर्यंत मुदत

मुंबई : रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे मोठ्या संख्येने इंजिनिअरची भरती करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी 13 हजारांपेक्षा अधिक पदं भरणार असल्याची घोषणा केली. ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता, डिपो स्टोअर अधीक्षक तसेच केमिकल मेटालर्जीकल असिस्टंट पदांसाठी ही भरती असेल. मंत्रालयने जाहीर केलेल्या माहितीनुसार या पदांसाठी सातव्या वेतनानुसार 34,400 ते 1,12,400 पगार असेल. 13 हजार 487 पदांसाठीच्या भरतीची माहिती रेल्वेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2019 पर्यंत आहे.

रेल्वेमध्ये अनेक पदं रिकामी आहेत ती लवकरात लवकर भरण्यासाठी ही भरती घेण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. ही भरती रेल्वे झोन आणि राज्यांसह संपूर्ण भारतातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता 

कनिष्ठ अभियंता पद : बेसिक इंजिनिअरिंग (तीन वर्षाचा डिप्लोमा)

डिपो स्टोअर अधीक्षक पद : इंजिनिअरिंग पदवीधर (कोणत्याही विषयात डिप्लोमा)

कनिष्ठ अभियंता पद : पीडीडीसीए, बीएससी (कॉम्प्युटर सायन्स), बीटेक (कॉम्प्युटर सायन्स) किंवा डीओईएसीसी ‘बी’ ग्रेडचा तीन वर्षाचा कोर्स पूर्ण असावा.

केमिकल मेटालर्जीकल असिस्टंट पद : विज्ञान शाखेतून 45 टक्केसह (भौतिक आणि रसायन शास्त्र) विषयातून पदवीधर असावा.

या सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

अर्ज कुठे करावा? 

यासाठी तुम्हाला रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. रेल्वेच्या www.indianrailway.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करताना तुमच्याकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे तसचे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI