9 वज्र तोफा, टी 90 टँक, राजपथावर भारताचं सामर्थ्य

नवी दिल्ली: देशभरात मोठ्या उत्साहात 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. यासाठी राजपथावर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. राजपथावर तिन्ही दलाचे पथसंचलन होत आहे. यामधील आज होत असलेल्या पथसंचलनामध्ये भारताच्या सामर्थ्याचं दर्शन होणार आहे. मात्र यामधील काही महत्त्वाचे सैन्य दल ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते अशा काही दलांचे आणि सैन्यदलांच्या शस्त्रांचे वैशिष्ट आम्ही तुम्हालां सांगत […]

9 वज्र तोफा, टी 90 टँक, राजपथावर भारताचं सामर्थ्य
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:34 PM

नवी दिल्ली: देशभरात मोठ्या उत्साहात 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. यासाठी राजपथावर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. राजपथावर तिन्ही दलाचे पथसंचलन होत आहे. यामधील आज होत असलेल्या पथसंचलनामध्ये भारताच्या सामर्थ्याचं दर्शन होणार आहे. मात्र यामधील काही महत्त्वाचे सैन्य दल ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते अशा काही दलांचे आणि सैन्यदलांच्या शस्त्रांचे वैशिष्ट आम्ही तुम्हालां सांगत आहोत.

परेडला सुरुवात

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दहशतवाद्यांसोबत लढत असताना शहीद झालेल्या नायक नजीर यांना मरणोत्तर अशोक चक्र दिले जाणार आहे. नायक नजीर हे 2004 साली दहशतवादाचा मार्ग सोडून सैन्य दलात भरती झाले होते. यावेळी त्यांनी अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

61 कैवलरी

शांतीच्या काळात घोडेस्वार पथक रेजीमेंटने 1918 मध्ये ऐतिहासिक लढाईमध्ये सहभाग घेतला होता.  या रेजीमेंटच्या जवानांनी जगभरात नाव कमावले होते. यासाठी या रेजीमेंटमधील जवानांना सर्वोच्च अशोक चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. मेजर नजरल सायरश ए पिठावाला, निवृत्त कर्नल जसबीर सिंह, लेफ्टनंट कर्नल डी श्रीराम कुमार, नि. ले. कर्नल जसरामसिंह , नि. नायब सुबेदार छेरिंग मुतुप, श्री गोविंद सिंह यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 टी 90 टँक

सैन्य दलाचा टी -90 टँक ज्याला भीष्म म्हटले जाते. हा टँक रशियामध्ये बनवण्यात आला आहे. यामध्ये 125 एमएम बोरची मुख्य गन लावण्यात आली आहे. जी मिसाईल रात्रीच्या वेळीही पाच किलोमीटरपर्यंत फायर करु शकते. या टँकद्वारे दुश्मनांचे टँक आणि हेलिकॉप्टर उद्धवस्त करता येऊ शकतात.

9 वज्र तोफ

52 कॅलिबरची 155 मिलीमीटर गन असणारी 9 वज्र तोफ राजपथावर परेडमध्ये सहभागी होणार आहे. अंदाजे तीन दशकांपासून तोफांचा सैन्यदलात समावेश झाला आहे. बोफोर्स घोटाळ्यानंतर तीन दशकापर्यंत एकही तोफेचा समावेश सैन्यदलात झाला नव्हता. याचे वजन 48 टन आहे आणि यामध्ये 5 जवानांची टीम असते. 60 किलोमीटरच्या स्पीडने लढाईत आपल्या टार्गेटला 38 किमीपर्यंत टार्गेट करु शकतात. दक्षिण कोरियाच्या सहाय्याने गुजरातमध्ये या तोफा बनवण्यात आल्या आहेत.

एम 777 अल्ट्रा लाईट होवित्जर

अमेरिकवरुन घेतलेले 39 कँलिबर ही एक आधुनिक गन आहे. ज्याची हल्ला करण्याची क्षमता 30 किलोमीटर आहे. वजन 4.3 टन आहे. या तोफेला डोंगराळ भागात तैनात करण्यात येते. 155 मिलीमीटर क्षमतेची ही गन चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आली आहे.

आकाश वेपन सिस्टम

आकाश वेपन सिस्टम हे देशातील पहिले एअर डिफेन्स सिस्टम आहे. जे कमी अंतरावर असणाऱ्या दुश्मनांवर हल्ला करु शकते. याचा वापर सध्या भूदलात आणि वायू दलात करण्यात येणार आहे.

धुव्र आणि रुद्रा हेलिकॉप्टर 

याला भारताच्या एअरोनेटिक्सने बनवले आहे. आधुनिक सोयीसुविधांनी हे हेलिकॉप्टर बनवले आहे. तसेच कोणत्याही वातावरणात हे हेलिकॉप्टर उडू शकते. यामध्ये गन आणि रॅकेटही आहेत.

राजपुताना रायफल्स

1856 मध्ये या रेजिमेंटने व्हिक्टोकराया क्रॉसवर विजय मिळवत बहादुरी दाखवली होती. तसेच 2008 मध्ये यांना बेस्ट मर्चिंग कंटीजेन्टचा किताब देऊन गौरवण्यात आले होते. ही रेजिमेंट राष्ट्रीय एकात्मेचे एक उत्तम उदाहरण आहे.

गोरखा ब्रिगेड

गोरखा एक अशी ब्रिगेड आहे की, जी मृत्यूला घाबरत नाही. बहादूर, धाडसी आणि मृत्यूलाही न जुमानता शत्रूंसोबत दोन हात करणारे गोरखा जवान अशी ओळख आहे. ही ब्रिगेड सर्व गोरखा रेजिमेंटना एकत्र घेत तयार करण्यात आली आहे. जय मां काली आयो गोर्खाली, असं या ब्रिगेडचं घोषवाक्य आहे.

 सीआरपीएप जवान

सीआरपीएफ देशातील सर्वात मोठी पॅरामिलिट्री फोर्स आहे. जी नक्षली तसेच दहशतवाद्यांविरोधात लढते. जर देशात कुठे काही संकट आले तर या जवानांना तैनात केले जाते.तसेच या होणाऱ्या कार्मक्रमामध्ये प्रत्येक राज्यातील संस्कृतीचं  दर्शन होणार आहे. त्यासोबतच शाळेतील मुलांचीही परेड येथे होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे भारत छोड़ो आंदोलनाची थीम  दाखवण्यात येणार आहे. तसेच महात्मा गांधीच्या विचांरावर आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचे प्रदर्शन या थीम या देखाव्यातून दाखवलं जाणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें