विस्तारवाद ही मानसिक विकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची चीनवर नाव न घेता टीका

दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही दिवाळी साजरी करण्यासाठी राजस्थानच्या जैसलमेर येथील लोंगेवाल चौकीवर पोहोचले आहेत. (India is proud of our forces, who protect our nation courageously says narendra modi)

विस्तारवाद ही मानसिक विकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची चीनवर नाव न घेता टीका


राजस्थान: दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही दिवाळी साजरी करण्यासाठी राजस्थानच्या जैसलमेर येथील लोंगेवाल चौकीवर पोहोचले आहेत. तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यावर माझा आनंद द्विगुणीत होतो, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विस्तारवाद ही मानसिक विकृती असल्याचं सांगत मोदींनी चीनवरही अप्रत्यक्ष हल्ला चढवला. (India is proud of our forces, who protect our nation courageously says narendra modi)

मी आज तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. प्रत्येक भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन आलो आहे, असं सांगतानाच वीर माता-भगिनींनाही मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या त्यागाला नमन करतो. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात आहेत, त्यांनाही मी वंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तुम्ही हिमाच्छादीत डोंगराळ भागात किंवा वाळवंटात कुठेही असले तरी तुमच्यामध्ये आल्यावरच माझी दिवाळी पूर्ण होते. तुमच्या चेहऱ्यावरील समाधानाची भावना पाहिल्यावर माझा आनंद द्विगुणीत होतो, असंही ते म्हणाले.

तुमच्या शौर्याचा समस्त भारतीयांना अभिमान आहे. जगातील कोणतीही ताकद आमच्या वीर जवांनाना देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यापासून रोखू शकत नाही, असंही ते म्हणाले. ज्या देशांमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता खच्चून भरलेली असते तोच देश सुरक्षित असतो. त्याच देशाचा विकास होत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

 

जग कितीही बदलले असेल, समीकरणं कितीही बदलली असतील तरीही सतर्कता हीच सुरक्षा आहे, सजगतेमुळेच सुख आणि समाधान येते, सामर्थ्यानेच विजय मिळतो आणि सक्षमतेनेच शांतता निर्माण होते, हे कधीही विसरून चालणार नाही. त्यामुळे शक्ती आणि पराक्रम यामध्येच भारताचं सामर्थ्य सामावले आहे. तुम्हीच आपल्या देशाला सुरक्षित ठेवल्यामुळे आपण आज वैश्विक स्तरावर आपली भूमिका प्रखरपणे मांडत असतो, असं मोदी म्हणाले.

चीनवर हल्लाबोल

यावेळी मोदी यांनी चीनचं नाव न घेता चीनवर हल्ला चढवला. आज संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींमुळे त्रस्त झाला आहे. विस्तारवाद ही मानसिक विकृती आहे. अठराव्या शतकातील मानसिकतेचं ते द्योतक आहे. त्याविरोधात भारत सातत्याने आपला आवाज बुलंद करेल, असा इशाराही त्यांनी दिला. (India is proud of our forces, who protect our nation courageously says narendra modi)

 

संबंधित बातम्या:

बदला घेतला! भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी चौक्या, पाहा तुफानी हल्ल्याचा VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता, नागरिकांना जवानांच्या नावे दिवा लावण्याचे आवाहन

(India is proud of our forces, who protect our nation courageously says narendra modi)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI