घरात घुसून मारण्यासाठी ओळखलं जाणारं हेलिकॉप्टर वायूदलाच्या ताफ्यात

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेला जगप्रसिद्ध अपाचे अटॅक हेलिकॉप्टर मिळण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकन कंपनी बोईंग निर्मिती AH-64E हेलिकॉप्टर जगातील सर्वात अत्याधुनिक आणि घातक हेलिकॉप्टरपैकी मानलं जातं. अमेरिकेतील एरिझोनामध्ये भारतीय वायूसेनेला हे पहिलं हेलिकॉप्टर मिळालं. भारताने अमेरिकेसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टरचा करार केलाय. या हेलिकॉप्टरमुळे भारताची घरात घुसून मारण्याची क्षमता कित्येक पटींनी वाढणार आहे. अपाचे हे […]

घरात घुसून मारण्यासाठी ओळखलं जाणारं हेलिकॉप्टर वायूदलाच्या ताफ्यात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेला जगप्रसिद्ध अपाचे अटॅक हेलिकॉप्टर मिळण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकन कंपनी बोईंग निर्मिती AH-64E हेलिकॉप्टर जगातील सर्वात अत्याधुनिक आणि घातक हेलिकॉप्टरपैकी मानलं जातं. अमेरिकेतील एरिझोनामध्ये भारतीय वायूसेनेला हे पहिलं हेलिकॉप्टर मिळालं. भारताने अमेरिकेसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टरचा करार केलाय. या हेलिकॉप्टरमुळे भारताची घरात घुसून मारण्याची क्षमता कित्येक पटींनी वाढणार आहे.

अपाचे हे पहिलं असं हेलिकॉप्टर आहे, जे भारतीय सैन्यात नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात सक्षम असेल. भारतीय सेनेकडून आतापर्यंत रशियन निर्मिती एमआय-35 चा वापर केला जात होता, पण हे हेलिकॉप्टर आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. शत्रूची किलेबंदी तोडून सीमेत घुसून मारा करण्याच्या दृष्टीनेच अपाचे हेलिकॉप्टर बनवण्यात आलंय.

या हेलिकॉप्टरमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर सोप्या पद्धतीने हल्ले करता येतील. संरक्षण तज्ञांच्या मते, युद्धाच्या वेळी हे हेलिकॉप्टर गेम चेंजर असेल.

अपाचे हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये

Boeing AH-64E अमेरिकन सैन्य आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण बलांसाठी आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर आहे, जे विविध कामं एकाचवेळी करण्यात सक्षम आहे.

अमेरिकेने या अपाचे हेलिकॉप्टरचा वापर पनामापासून ते अफगाणिस्तान आणि इराकमधील शत्रूंसोबतही केला आहे.

अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिकतेसाठी हे हेलिकॉप्टर तयार करण्यात आलं होतं. या हेलिकॉप्टरने पहिली उड्डाण 1975 साली घेतली, पण अमेरिकन सैन्यात हे हेलिकॉप्टर 1986 मध्ये दाखल झालं.

अमेरिकेशिवाय इस्रायल, इजिप्त आणि नेदरलँडकडेही अपाचे हेलिकॉप्टर आहे.

अपाचे अटॅक हेलिकॉप्टरमध्ये दोन जनरल इलेक्ट्रिक T700 टर्बोशिफ्ट इंजिन आणि पुढच्या बाजूने एक सेन्सर आहे, ज्यामुळे रात्रीच्या अंधारातही उड्डाण घेता येते. 365 किमी प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर मिसाईल लावण्यात आलेले आहेत, तर दोन्ही बाजूंना 30mm च्या गन आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये एवढी विस्फोटकं भरली जाऊ शकतात की ज्यामुळे शत्रूचं वाचणं अशक्य होऊन जातं.

या हेलिकॉप्टरचं वजन 5165 किलो असून यामध्ये दोन पायलट्ससाठी जागा आहे.

इंटिग्रेटेड हेलमेट, डिस्प्ले साइटिंग सिस्टम (Integrated Helmet and Display Sighting System), हेल्मेट माऊंडेट डिस्प्ले ही अपाचे हेलिकॉप्टरची सर्वात क्रांतीकारी फीचर मानली जातात. यामुळे हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या ऑटोमॅटिक M230 चेन गनचा निशाणा शत्रूवर साधता येतो.

सर्व प्रकारच्या वातावरणांमध्ये काम करण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.