भारताचे मिग 21 विमान कोसळलं

जयपूर: भारतीय वायूदलाचं मिग 21 हे विमान राजस्थानमध्ये कोसळलं आहे. बिकानेरमधील शोभासर गावाजवळ मिग 21 हे लढाऊ विमान कोसळलं. नाल हवाईतळाजवळ शोभासर हे गाव आहे. विमान कोसळल्यानंतर पायलट सुरक्षितरित्या बाहेर आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. बिकानेर जिल्हाधिकाऱ्यांनी विमान दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  मिग 21 कोसळल्यानंतर गावकऱ्यांनीही धुराचे लोट पाहिल्याचं नमूद केलं. इतकंच नाही तर गावकऱ्यांनी […]

भारताचे मिग 21 विमान कोसळलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

जयपूर: भारतीय वायूदलाचं मिग 21 हे विमान राजस्थानमध्ये कोसळलं आहे. बिकानेरमधील शोभासर गावाजवळ मिग 21 हे लढाऊ विमान कोसळलं. नाल हवाईतळाजवळ शोभासर हे गाव आहे. विमान कोसळल्यानंतर पायलट सुरक्षितरित्या बाहेर आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

बिकानेर जिल्हाधिकाऱ्यांनी विमान दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  मिग 21 कोसळल्यानंतर गावकऱ्यांनीही धुराचे लोट पाहिल्याचं नमूद केलं. इतकंच नाही तर गावकऱ्यांनी दोन पायलट पॅराशूटद्वारे बाहेर आल्याचंही गावकऱ्यांनी पाहिलं.

नाल हवाईतळ हे पश्चिम राजस्थानातील महत्त्वाचं हवाईतळ आहे.

मिग 21 हे भारताचं लढाऊ विमान आहे. या विमानाला सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे मिग 21 विमाने वायूदलातून हद्दपार करण्याची मागणी झाली होती.

मिग 21 ही विमाने भारताच्या ताफ्यात 1963 मध्ये आली. मात्र इतकी जुन्या विमानांमध्ये तात्रिंक बिघाड येऊन ही विमानं कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

मिग 21 विरोधात याचिका

दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या बालाकोटवर हवाई हल्ला केला. त्यादरम्यान वायूदलाचे विंग किमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने पकडले. त्यांची सुटकाही झाली. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात एका संस्थेने मिग 21 या लढाऊ विमानांच्या वापराला आक्षेप घेत याचिका दाखल केली. मिग 21 या जुन्या विमानांचा अद्याप भारताच्या हवाई दलामध्ये का समावेश आहे, भारतीय वैमानिकांचा जीव धोक्यात का घातला जात आहे, अशी विचारणा या याचिकेमधून करण्यात आली आहे.

वायूसेनेने मिग 21 विमाने हद्दपार करावी, असे निर्देश सरकार आणि वायूसेनेला द्या अशी मागणी याचिकेत केली आहे.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.