रवींद्र जाडेजाने सांगितलं अप्रतिम क्षेत्ररक्षणामागचं ‘सिक्रेट’, म्हणाला…

भारताचा ऑलराउंडर स्टार क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण कित्येकदा सामना पलटावून टाकते. त्याने अप्रतिम क्षेत्रक्षणामागील कारण सांगितले आहे.

रवींद्र जाडेजाने सांगितलं अप्रतिम क्षेत्ररक्षणामागचं 'सिक्रेट', म्हणाला...
रवींद्र जाडेजा

मुंबई : भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामागील गुपित सांगितलं आहे. सध्या तिन्ही फॉर्मेटमध्ये अप्रतिम खेळी करणारा जाडेजा क्षेत्ररक्षण करताना पक्षाप्रमाणे उडून झेल पकडतो, चित्त्यासारखा धावून चौकार रोखतो आणि वीजेच्या वेगाने थ्रो करुन धावबादही करतो. अशा अष्टपैलू जाडेजाने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या क्षेत्ररक्षणाबाबत विस्तारानं माहिती दिली. (Indian Cricketer Ravindra Jadeja told secret behined his outstanding fielding)

रवींद्र जाडेजाने अनेकदा उत्कृष्ट थ्रो करत दिग्गज फलंदाजाना बाद केलं आहे. ज्यामुळे भारताला सामना जिंकण्यात मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्याच्या थ्रो फेकण्याच्या अप्रतिम गतीबाबत विचारताच, ”याबद्दल तुम्ही माझ्या वडिलांना विचारायला हवं, त्यांचेच जीन माझ्यात आले आहेत. त्यासोबतच मी भरपूर मेहनत घेऊन आपल्या क्षेत्ररक्षणात सुधार केला आहे.” असं उत्तर जाडेजानं दिलं.

फिल्डिंग केल्यावरच बॅटिंग मिळायची

क्षेत्ररक्षणाबद्दल सांगताना जाडेजा म्हणाला, ”लहानपणी जामनगर येथील माझे प्रशिक्षक महेंद्र सिंह चौहान आम्हाला खूप पळवायचे. खूपवेळ नुसती फिल्डिंगच करायला लावायचे.  त्यानंतरच आम्हाला बॅटिंग करायला मिळायची. मी सुरुवातीला चार वर्ष फक्त फिल्डिंगच केली. आमचे प्रशिक्षक कडक दिसायचे पण त्यांच्याच मदतीनं मी माझं क्षेत्ररक्षण सुधारु शकलो”

खांद्याची काळजी महत्त्वाची

एक क्षेत्ररक्षक त्यात फलंदाजीसह गोलंदाजीही करावी लागत असल्याने दुखापतींना सतत सामोरं जावं लागत. त्याबद्दल जाडेजाने सांगितले, ”मी 12-13 वर्षांपासून खेळतो आहे. एवढ्या वर्षांत खांद्याना छोट्या-मोठ्या दुखापती होत असतात. त्यामुळे मी माझ्या खांद्याची अतिशय काळजी घेतो”

हे ही वाचा :

‘रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती’, रवींद्र जाडेजाने शेअर केला ‘तो’ अनुभव

गुगलवर विराट कोहली काय सर्च करत असेल?, स्वत:च Google History शेअर केली, पाहा…

ट्रोलर्सना कसं देतोस उत्तर?, चाहत्याच्या प्रश्नावर कोहलीचा हटके जवाब, फोटो शेअर करत दिलं उत्तर

(Indian Cricketer Ravindra Jadeja told secret behined his outstanding fielding)