बिग बींवरील सायबर हल्ल्याला भारतीयांचं उत्तर, पाकिस्तानच्या 5 वेबसाईट्स हॅक

तुर्कीच्या अयिल्दिज टीम नावाच्या सायबर आर्मीने बिग बी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केलं. भारतीय हॅकर्सनेही याचा काही तासातच बदला घेतला. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानच्या पाच वेबसाईट हॅक करुन बिग बींना त्रास दिल्याचा बदला घेतला.

बिग बींवरील सायबर हल्ल्याला भारतीयांचं उत्तर, पाकिस्तानच्या 5 वेबसाईट्स हॅक

मुंबई : 10 जून रोजी बिग बी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं. बिग बी यांचे जवळपास पावणे चार कोटी फॉलोअर्स आहेत. या हायप्रोफाईल अकाऊंटवरुन पाकिस्तान प्रेमाचे ट्वीट टाकण्यात आले. तुर्कीच्या अयिल्दिज टीम नावाच्या सायबर आर्मीने बिग बी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केलं. भारतीय हॅकर्सनेही याचा काही तासातच बदला घेतला. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानच्या पाच वेबसाईट हॅक करुन बिग बींना त्रास दिल्याचा बदला घेतला.

आईसलँडमध्ये आमच्यासोबत झालेल्या गैरव्यवहाराचा बदला घेत असल्याचं तुर्कीच्या हॅकर्स ग्रुपने सांगितलं. तुर्कीचा संघ 2020 मध्ये होणाऱ्या युरो चषकाच्या क्वालीफाईंग सामन्यासाठी आईसलँडला गेला होता. पण त्यांची विमानतळावरच चौकशी करण्यात आली आणि माध्यमांकडूनही त्रास देण्यात आला. त्यामुळे तुर्कीच्या सायबर टीमने भारताच्या सर्वात मोठ्या सेलिब्रिटीचं अकाऊंट हॅक करुन त्रास दिला. तर बिग बींना हा त्रास दिल्यामुळे भारतीय हॅकर्स ग्रुपने पाकिस्तानच्या वेबसाईट हॅक केल्या. यात कुणाचाही कुणाशी संबंध नव्हता, पण एकमेकांचे अकाऊंट हॅक करण्यात आले.

भारतीय हॅकर्सने हॅक केलेल्या अकाऊंटमध्ये होमपेजवरच तिरंगा हातात घेऊन अमिताभ बच्चन यांना फोटो पोस्ट करण्यात आला. शिवाय ‘फील द पावर ऑफ इंडिया’ असं कॅप्शनही देण्यात आलं. विशेष म्हणजे पेजवर दिलेल्या लिंक ओपन करताच वंदे मातरम् आणि माँ तुझे सलाम ही गाणी प्ले होत होती.

हॅक केलेल्या पाकिस्तानच्या वेबसाईट्स

  1. http://www.traditionalarts.pk/
  2. http://www.swordedge.pk
  3. http://www.mmaprosports.pk/index.php
  4. http://www.mail.goya.pk
  5. http://www.gmcs.edu.pk/

यापूर्वीही भारतीय हॅकर्सने ऑगस्ट 2017 मध्ये पाकिस्तानची सरकारी वेबसाईट हॅक केली होती. ही वेबसाईट ओपन करताच अशोक चक्र दिसत होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI