शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार, कोल्हापुरातील उंबरवाडीत अखेरचा निरोप

शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार, कोल्हापुरातील उंबरवाडीत अखेरचा निरोप

गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले (Jotiba Choughule funeral kolhapur) यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

सचिन पाटील

|

Dec 18, 2019 | 10:29 AM

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले (Jotiba Choughule funeral kolhapur) यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. उंबरवाडी गावचे रहिवासी असलेले जोतिबा चौगुले (Jotiba Choughule funeral kolhapur) हे जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये रविवारी रात्री (16 डिसेंबर) अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले. दोन दिवसानंतर त्यांचं पार्थिव मूळगावी आणण्यात आलं.

आज शहीद जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार (Jotiba Choughule funeral kolhapur) करण्यात आले.

जवान जोतिबा चौगुले यांच्या अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या गावातील लोकांनी चौगुले यांना आलेल्या वीरमरणाचा अभिमान व्यक्त केला. याशिवाय गावातल्या तरुणांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही केला.

चौगुले यांना आदरांजली वाहण्यासाठी महागाव आणि उंबरवाडीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. महागावाची बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून चौगुलेंना श्रद्धांजली वाहिली.  दरम्यान, चौगुलेंच्या अंत्ययात्रेसाठी शाळेतील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले  होते. त्यासोबतच शोकाकूल वातावरणात चौगुलेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चौगुलेंना शेवटचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावलेले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें