मॅनचेस्टर विमानतळावर पाकिस्तानी क्रिकेटर वासिम अक्रमसोबत गैरवर्तन

वेगवान गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांच्या नाकात दम करणारे पाकिस्तानचे माजी कर्णधार वासिम अक्रम यांच्यासोबत इंग्लंडमधील मँचेस्टर विमान तळावर गैरवर्तन झाले.

मॅनचेस्टर विमानतळावर पाकिस्तानी क्रिकेटर वासिम अक्रमसोबत गैरवर्तन
Follow us
| Updated on: Jul 24, 2019 | 12:06 PM

लंडन : वेगवान गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांच्या नाकात दम करणारे पाकिस्तानचे माजी कर्णधार वासिम अक्रम यांच्यासोबत इंग्लंडमधील मँचेस्टर विमान तळावर गैरवर्तन झाले. स्वतः वसीम अक्रम यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

वासिम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “मंगळवारी मँचेस्टर विमानतळावर माझ्यासोबत झालेल्या वर्तणुकीने मी दुःखी आहे. मी माझे इन्सुलिन घेऊन जगभरातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. मात्र, मला कधीही अशाप्रकारे अपमानित व्हावे लागले नाही.”

विमानतळ प्रशासनाने आपल्या इन्सुलिन औषधांची व्यवस्थित काळजी घेतली नाही. शुकरचा त्रास असणाऱ्या रुग्णांना नेहमीच आपले इन्सुलिन थंड ठिकाणी ठेवावे लागते. त्यासाठी विशिष्ट केसचा (पिशवी) उपयोग केला जातो. मात्र, विमानतळावर प्रशासनाने इन्सुलिन संबंधित केसमधून प्लास्टिकच्या पिशवीत नेण्यास सांगितले, असंही वासिम यांनी नमूद केलं.

वासिम म्हणाले, “विमानतळावरील अधिकारी माझ्याशी अत्यंत उद्धटपणे बोलले आणि चौकशी केली. तसेच अपमानितही केले. माझ्याकडील इन्सुलिन औषधे सार्वजनिकरित्या थंड पिशवीतून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायला सांगितले.”

वासिम अक्रम यांची कारकिर्द

53 वर्षीय वासिम अक्रम डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनी 1984 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी आपला पहिला सामना 23 नोव्हेंबर 1984 रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. तर शेवटचा एकदिवसीय सामना 2003 मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध खेळला.

अक्रमने 356 एकदिवसीय सामन्यात 23.53 च्या सरासरीने 502 विकेट घेतल्या. तसेच 104 कसोटी सामन्यात 23.62 च्या सरासरीने 414 विकेट घेतल्या.

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.