अजितदादांचा दाखला देत बापटांना प्रश्न, त्रस्त पुणेकरांची पुणेरी पाटी

पुणे : पुण्यातील पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. त्यामुळे अर्थात पुणेकरांमध्ये संतापाची लाट आहे. याच संतापाचा उद्रेक पुणेकरांनी आपल्या अस्सल पुणेरी स्टाईलमध्ये पुण्यातील काही ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. हे पोस्टर्स सध्या पुणेकरांच्या कुतुहल आणि चर्चेचा विषय ठरले असले, तरी यातून विचारलेला प्रश्न पुणेकरांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे. “गिरीष काय रे? दुष्काळ असतानासुध्दा अजितने कधी पाणी […]

अजितदादांचा दाखला देत बापटांना प्रश्न, त्रस्त पुणेकरांची पुणेरी पाटी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे : पुण्यातील पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. त्यामुळे अर्थात पुणेकरांमध्ये संतापाची लाट आहे. याच संतापाचा उद्रेक पुणेकरांनी आपल्या अस्सल पुणेरी स्टाईलमध्ये पुण्यातील काही ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. हे पोस्टर्स सध्या पुणेकरांच्या कुतुहल आणि चर्चेचा विषय ठरले असले, तरी यातून विचारलेला प्रश्न पुणेकरांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे.

“गिरीष काय रे? दुष्काळ असतानासुध्दा अजितने कधी पाणी कमी पडु दिले नाही! तु तर आपल्या शहरातला ना? पाणी कुठं मुरतंय? – एक त्रस्त पुणेकर नागरिक” अशा आशयाचे पोस्टर पुणेकरांनी पुण्यात लावले आहेत. या पोस्टरची सध्या पुण्यात आणि सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे.

या पोस्टरमधील ‘गिरीष’ म्हणजे भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि ‘अजित’ म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार होय.

दरम्यान, हे पोस्टर नेमके कुणी लावले आहे, याचा उल्लेख ना पोस्टरवर आहे, ना कुणाला अद्याप कळू शकले. त्यामुळे पोस्टर लावणाऱ्याबाबत सुद्धा गूढ कायम आहे. मात्र, गूढ केवळ पोस्टरबाबत आहे, पोस्टरवरील प्रश्न पुणेकरांच्या रोजच्या जगण्यातला उघड आणि कळीचा आहे.

पुण्यातल्या पाणीप्रश्नाची आता काय स्थिती आहे?

पुणे शहराला 15 जुलैपर्यत पाणीपुरवठा करायचा असेल, तर पाणी कपातीला पर्याय नाही. मुंबईप्रमाणे पुण्यानेही पाणी काटकसरीने वापरण्याबाबतचे नियोजन करणे गरजेच आहे. या संदर्भात काल कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयात बैठक झाली. त्यात पुण्यातील पाणी नियोजनावर चर्चा होऊन पाणी कपातीचा निर्णय पालकमंत्री आणि कालवा समिती घेतील.

सद्यस्थितीला 1300 एमएलडी पाणीपुरवठा शहराला केला जातोय. मात्र जीवन प्राधिकरणाने 960 एमएलडी पाणी वापरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यामध्येच पुणे महापालिकेने पाणी वापरावे, असं आवाहन केलं आहे. त्याच बरोबर येत्या काळात पाणी कपात करण्याचे संकेत कृष्णा खोरेच्या कार्यकारी संचालक यांनी दिलेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.