Drugs Case | दीपिकाच्या मॅनेजरला तात्पुरता दिलासा, शनिवारपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला मोठा दिलासा मिळाला आहे.

Drugs Case | दीपिकाच्या मॅनेजरला तात्पुरता दिलासा, शनिवारपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश
करिष्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर आहे.


मुंबई : बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सेशन कोर्टाने करिश्मा प्रकाशला शनिवारपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला आहे. यावेळी न्यायालयाने करिश्मा प्रकाशला देखील एनसीबीच्या चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश दिले (Interim relief to Karishma Prakash by court).

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी करिश्मा प्रकाश हिच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीत त्यांना 1.7 ग्रॅम हशीष ड्रग्स आणि भारतात बंदी असलेल्या सीबीडी ऑइलच्या (CBD Oil) 2 बाटल्या सापडल्या होत्या. याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात करिश्माला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत 27 ऑक्टोबर रोजी समन्स देण्यात आलं होतं. तसेच 28 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र,करिश्मा चौकशीसाठी हजर राहिली नाही. उलट तिने 29 ऑक्टोबर रोजी मुंबई सेशन कोर्टात धाव घेतली.

मुंबई सेशन कोर्टात आज (3 नोव्हेंबर) तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने शनिवारपर्यंत (7 नोव्हेंबर) करिश्माला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, करिष्माला चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी बोलवतील तेव्हा हजर रहावं लागणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी कोर्ट करिष्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम निर्णय देणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या करिश्माला आता दीपिकाने कामावरून काढल्याचं सांगण्यात येत आहे. करिश्माच्या घरात ड्रग्ज आढळल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविला होता. मात्र, दोनदा समन्स पाठवूनही करिश्मा या चौकशीला हजर राहिली नाही. यामुळे एनसीबीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

करिश्मा गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर पुन्हा एकदा एनसीबीच्या चौकशीत अडकण्याचा धोका वाटल्याने दीपिकाने तिला थेट कामावरूनच काढून टाकले आहे. करिश्माने स्वतःहून राजीनामा दिला आहे असंही सांगितलं जात आहे. मात्र, सध्या तरी दीपिकानेच तिला काढल्याची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या :

Drug Connection | पुन्हा एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची भीती, दीपिकाने करिश्माला कामावरूनच काढले!

Bollywood Drug Connection | कोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल, दीपिका पदुकोणची मॅनेजर 4 दिवसांपासून गायब!

ड्रग्ज चॅट ग्रुपची ‘अॅडमिन’ दीपिका पदुकोण, मॅनेजरची खळबळजनक कबुली

संबंधित व्हिडीओ :

Interim relief to Karishma Prakash by court

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI