जगातील सर्वात श्रीमंत मांजरीचे निधन, 7 अब्ज 3 कोटी 48 लाखांची मालक

जगातील सर्वात श्रीमंत मांजरीचे निधन, 7 अब्ज 3 कोटी 48 लाखांची मालक

न्यूयॉर्क अमेरिका : इंटरनेटवरील सेलिब्रिटी आणि जगातील सर्वात श्रीमंत मांजर अशी ओळख असलेल्या ग्रुम्पी नावाच्या मांजराचे Grumpy Cat काल निधन झालं. ग्रुम्पी कॅट तिच्या रागट लुकसाठी इंटरनेटवर प्रसिद्ध होती. ग्रुम्पी कॅट 100 मिलियन डॉलर म्हणजे 7 अब्ज, 3 कोटी, 48 लाख रुपये मालकीन असल्याचा दावा केला जातो. वयाच्या 7 व्या वर्षी तिचे निधन झालं. तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Grumpy Cat चे खरे नाव Tardar Sauce असे होते. मृत्राचा संसर्ग झाल्याने ग्रुम्पीचा मृत्यू झाला. जगातील सर्वात रागीट मांजर अशी ग्रुम्पीची ओळख आहे. तिचे नाक अतिशय चपटे होते. जगात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॅगिझिनवरही कित्येकदा ती झळकली होती. विशेष म्हणजे ग्रुम्पीवर एक हॉलिवूड चित्रपटही प्रसिद्ध करण्यात आला.

मॉरिसटाऊनचे प्रसिद्ध उद्योजक तबाथा यांची ही कॅट आहे. ग्रुम्पीचा 2012 साली एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तिच्या चेहऱ्यावरील रागट हावभाव दाखवण्यात आले होते. या व्हिडीओ 15.7 मिलियन लोकांनी बघितला होता. त्यानंतर ती एखाद्या हॉलिवूड सेलिब्रिटीप्रमाणे प्रसिद्ध झाली होती. तिचे ट्विटरवर 1.53 मिलियन फॉलोअर्स आहे.

मांजरीची संपत्ती खरंच 100 मिलियन?

या मांजरीच्या संपत्तीविषयी विविध वृत्तांमध्ये दावा केला जातो. पण मांजरीच्या मालकीणीला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी याचं खंडन केलं. ग्रंपी कॅटची मालकीण टबाथा बंडेसेनला याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी 8 डिसेंबर 2014 रोजी हफिग्टंन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताचं खंडन केलं. 100 मिलियन डॉलर्स संपत्तीचा आकडा खोटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विविध डील्सच्या माध्यमातून आर्थिक कमाई होत असली तरी ती एवढी जास्त नाही. मात्र, खरी किती संपती आहे याचा त्यांनी खुलासा केला नव्हता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI