अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर इराणचा पुन्हा क्षेपणास्त्रांचा हल्ला, आता युद्ध होणार?

इराणने पुन्हा एकदा अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर हल्ला केला आहे. त्यामुळे आता युद्धाचे ढग पुन्हा एकदा दाटून आले आहेत. इतर राष्ट्रांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर इराणचा पुन्हा क्षेपणास्त्रांचा हल्ला, आता युद्ध होणार?

बगदाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. इराणने रविवारी (11 जानेवारी) इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर आठ क्षेपणास्त्रांचा हल्ला केला (Iran attack on American airbase in Iraq). या हल्ल्यात 4 जण जखमी झाले आहेत. यात इराकचे 2 लष्करी अधिकारी आणि 2 एअरमन आहेत. याअगोदरही 8 जानेवारी रोजी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता (Iran attack on American airbase in Iraq).

इराणने अमेरिकेच्या इराकमधील अल-बलाद या हवाईतळावर  हल्ला केला. एफ-16 या लढाऊ विमानांचे हे मुख्य हवाईतळ आहे. आपल्या हवाईदलाची क्षमता वाढविण्यासाठी इराकने एफ-16 हे लढाऊ विमान अमेरिकेकडून खरेदी केले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने या हवाईतळांना दोन आठवड्यांपूर्वीच स्थलांतरित केले होते.

इराणने 8 जानेवारी रोजी केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड राग आला होता. “अमेरिकेचे लष्करी बळ हे जगात नंबरवन आहे. त्यामुळे इराणने अमेरिकेच्या नांदी लागू नये”, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

इराणमध्ये 8 जानेवारी रोजी विमान अपघात झाला होता. या अपघातात सर्व 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इराणच्या चुकीमुळे हा अपघात घडला होता. याबाबत इराणने देखील आपली चूक मान्य केली. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर इराणमधील नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची इराणबाबतची भूमिका सौम्य झाली होती. “आम्हाला इराणमध्ये अन्यायाविरोधात लढणाऱ्या आंदोलकांना मारायचे नाही”, असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र, रविवारी इराणने पुन्हा हल्ला केल्यानंतर अमेरिका आता गप्प बसणार नाही, हे आता निश्चित आहे.

“इराणबाबतची भूमिका सौम्य झाल्यानंतर अमेरिका इराणच्या नेत्यांशी चर्चा करायला तयार होते. मात्र, या हल्ल्यानंतर चर्चा होणे कठीण आहे”, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर म्हणाले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ट्विट करुन हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या :

इराणकडून चूक मान्य, युक्रेनच्या विमानावर क्षेपणास्त्र हल्ला, 176 प्रवाशांचा मृत्यू

अमेरिका-इराण तणाव शिगेला, तेहरानजवळ विमान कोसळून 176 प्रवाशांचा मृत्यू

इराणचं अमेरिकेला प्रत्युत्तर, अमेरिकेच्या इराकमधील दोन सैन्य ठिकाणांवर हल्ला

आखाती देशात युद्धाची शक्यता, इराणमध्ये मशिदीवर लाल झेंडा, अमेरिकेचं ड्रोनही पाडलं

जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट, युद्ध झालंच तर ‘हे’ देश येणार समोरासमोर

अमेरिकेच्या नाकी नऊ आणणारे इराणचे जनरल कासिम सुलेमानी ठार, अमेरिकेचं ‘सर्जिकल स्ट्राईक’

Published On - 8:08 am, Mon, 13 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI