इस्रायलचा सीरियावर हवाई हल्ला, शस्त्र भांडार नेस्तनाबूत

दमास्कस/मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्य सीरियातून माघारी बोलावल्यामुळे जगभरात विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच सीरियाची दुसरी अडचण म्हणजे इस्रायल आणि सीरिया यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय. याचीच परिणीती म्हणजे नुकताच इस्रायलने सीरियन लष्कराच्या शस्त्र कोठारावर हवाई हल्ला केला. इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसनजिक हवाई हल्ला केला. सीरियन लष्कराच्या मते हा इस्रायलने त्यांच्या […]

इस्रायलचा सीरियावर हवाई हल्ला, शस्त्र भांडार नेस्तनाबूत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

दमास्कस/मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्य सीरियातून माघारी बोलावल्यामुळे जगभरात विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच सीरियाची दुसरी अडचण म्हणजे इस्रायल आणि सीरिया यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय. याचीच परिणीती म्हणजे नुकताच इस्रायलने सीरियन लष्कराच्या शस्त्र कोठारावर हवाई हल्ला केला.

इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसनजिक हवाई हल्ला केला. सीरियन लष्कराच्या मते हा इस्रायलने त्यांच्या शस्त्रसाठ्यांच्या कोठारावर केलेला हवाई हल्ला होता. या दरम्यान स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले. या हवाई हल्ल्यात तीन सैनिक जखमी झाल्याची माहिती सीरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे या हल्यानंतर इतर सर्व क्षेपणास्त्र मध्येच अडवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी नाकारत, सीरियाचे क्षेपणास्त्र पाडण्यासाठी हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यरत केली होती, एवढंच स्पष्टीकरण दिलं. इस्रायलच्या लष्करी साधनांची कोणतीही हानी झालेली नाही, तसंच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती इस्रायलकडून देण्यात आली.

इस्रायल संरक्षण बलाकडून या ‘कथित’ हवाई हल्ल्याच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. इस्रायलने यापूर्वीही अनेकदा सीरियामधील इराणी आणि हिजबुल्लांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याच्या भावनेतून इस्रायलकडून हे पाऊल उचलण्यात आलं होतं.

इस्रायलने सीरियावर केलेल्या अशा प्रकारच्या हल्ल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही गेल्या वर्षी मे महिन्यात इस्रायलने सीरियामध्ये असलेल्या इराणच्या जवळपास सर्व लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला चढवला होता. तर 2011 मध्ये सुरू झालेल्या यादवीनंतर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला असल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर गोलन हाईट्स भागातल्या इस्रायलच्या लष्करी तळावर प्रतिहल्ल्यादाखल सीरियानेही रॉकेट हल्ला करत प्रत्युत्तर दिलं होतं. पश्‍चिम आशियात आणि जगात इतरत्र फोफावलेल्या दहशतवादाचे मूळ कारण हे इस्रायलचा द्वेष आहे. त्यामुळे हे युद्ध थांबण्याऐवजी अधिक फोफावत चाललंय.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.