जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

शेतामध्ये सापडले अप्लपवयीन 2 मुलं आणि 2 मुलींचे मृतदेह, राज्यात खळबळ

जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

जळगाव : जळगावमधून राज्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. रावेरमध्ये एकाचवेळी चौघांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये 2 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (jalgaon crime news 2 girls and 2 boys murder dead body found in Farm)

मिळालेल्या माहितीनुसार, रावेरच्या बोरखेडा रोडवरील शेतात ही घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारात गावतील काहींना शेतामध्ये चौघांचा मृतदेह आढळला. यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांचीही कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. तर हे चौघेही अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून हत्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मुलं आणि दोन मुलींचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

इतर बातम्या –

सावधान! मेंदूत जळजळ झाल्यास गंभीर; कोरोनाचं समोर आलं धक्कादायक लक्षणं

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

(jalgaon crime news 2 girls and 2 boys murder dead body found in Farm)

Published On - 11:02 am, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI