Jalgaon Rain | जळगावात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार, 15 तालुक्यात 39.40 मिमी पावसाची नोंद

यावल जवळील मोर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे वाघूर धरणाचे चारपैकी दोन दरवाजे 5 सेंटीमिटरने उघडण्यात आले आहेत.

Jalgaon Rain | जळगावात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार, 15 तालुक्यात 39.40 मिमी पावसाची नोंद

जळगाव : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार (Jalgaon Rain Update) पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. 15 तालुक्यांमध्ये 39.40 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावल जवळील मोर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे वाघूर धरणाचे चारपैकी दोन दरवाजे 5 सेंटीमिटरने उघडण्यात आले आहेत. यातून गेल्या तीन दिवसापासून 5.91 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे (Jalgaon Rain Update).

जळगावात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. 15 तालुक्यांमध्ये 39.40 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस खूपच लाभदायी ठरणार असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गुरुवारी (16 जुलै) सकाळी 7 वाजेपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. जळगाव शहरात दमदार पाऊस झाला. शहरातील नवीपेठ, गोलाणी मार्केट, बजरंग बोगदा, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा उपनगर, शिवधाम परिसर, बिबा पार्क यासारख्या सखल भागात पाणी साचले. पिंप्राळा उपनगर, वाघनगर याठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.

जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून कापूस, ज्वारी, मका, सोयाबीन तसेच उडीद-मूग यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. भडगाव तालुक्यात देखील काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे (Jalgaon Rain Update).

वाघूर धरणाचे 2 दरवाजे 5 सेंटीमिटरने उघडले

यावल तालुक्यातील हिगोंणा पुढे सातपुड्याच्या कुशीत मोर मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता 5.191 दलघमी आहे. तर या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे सातपुड्यातील असून सद्या सातपुड्याच्या कुशीत चांगला पाऊस सुरु आहे. परिणामी हे धरण पहिल्यांदाच जून महिन्यात 65.22 टक्के भरले आहे. सध्या 6.736 दलघमी जलसाठा धरणात झाला असून अजून संपुर्ण पावसाळा बाकी आहे. म्हणून गेल्या तीन दिवसांपासुन या मोर मध्यम प्रकल्पातील चार पैकी 2 दरवाजे 5 सेंटीमिटरने उघडण्यात आले आहेत.

यामुळे दररोज मोर नदी पात्रात 210.15 दलघमी पाण्याचा वर्सग सुरु आहे. हे पाणी फैजपूर, आमोदा, अंजाळे कडून तापी नदी पात्रात येत आहे. तर या विर्सग मुळे शेत विहिरीच्या पाण्यात देखील वाढ होण्यास मदत होणार आहे.

Jalgaon Rain Update

संबंधित बातम्या :

पुढील पाच दिवसात विदर्भात तुरळक पाऊस, नागपूर हवामान विभागाचा अंदाज

Published On - 8:24 pm, Thu, 16 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI