काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा नंगानाच सुरुच, 5 जवान जखमी

नवी दिल्ली: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, तिकडे काश्मीर खोऱ्यात मात्र दहशतवाद्यांचा नंगानाच सुरुच आहे. आजच्या दिवशीही भारतीय सैनिक दहशतवाद्यांशी दोन हात करत आहेत. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात पुलवामातील पंपोर आणि खानमो परिसरात हल्ला केला. दहशतवाद्यांनी SOG आणि CRPF कॅम्पला लक्ष्य […]

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा नंगानाच सुरुच, 5 जवान जखमी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

नवी दिल्ली: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, तिकडे काश्मीर खोऱ्यात मात्र दहशतवाद्यांचा नंगानाच सुरुच आहे. आजच्या दिवशीही भारतीय सैनिक दहशतवाद्यांशी दोन हात करत आहेत. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात पुलवामातील पंपोर आणि खानमो परिसरात हल्ला केला. दहशतवाद्यांनी SOG आणि CRPF कॅम्पला लक्ष्य केलं. त्यानंतर जवानांनी त्यांना चोख उत्तर दिलं.

प्रजासत्ताक दिनी पहाटेपर्यंत दक्षिण काश्मीरमधील पुलवामा इथं दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरल्याचं सांगण्यात येत आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचं सांगण्यात येत आहे. हे दहशतवादी प्रजासत्ताक दिनी कोणती तरी मोठ्या कारवाईच्या तयारीत होते. त्याआधी गुरुवारी पाकिस्तानने पूँछ, राजौरी सेक्टर आणि सुंदरबनी परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून या परिसरात गोळीबार करण्यात येत होता. मग भारतानेही त्याला चोख उत्तर दिलं.

सीमेवर सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. इथला पारा प्रचंड घसरला आहे. हाडं गोठवणारी थंडी आहे. त्यामध्ये उभं राहून भारतीय जवान देशाचं रक्षण करत आहेत. बुधवारी भारतीय सैन्याने बारामुल्ला परिसरात लष्कर ए तैयबाच्या 3 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं होतं.

गेल्या वर्षभरात भारताने काश्मीरमध्ये 260 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरमधील टॉप 12 पैकी 10 दहशतवादी कमांडरचा बंदोबस्त केला आहे. गुप्तचर संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमेपलिकडून जवळपास 300 पेक्षा अधिक दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र भारताचे वीर जवान त्यांचा खात्मा करण्यासाठी सज्ज आहेत.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.