पुन्हा ‘पुलवामा’चा प्रयत्न, CRPF च्या बसला स्फोटकांची कार धडकली
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर पुलवामासारखा हल्ला होता होता राहिला. स्फोटकाने भरलेल्या एका कारने सीआरपीएफच्या बसला मागून धडक दिली. मात्र सुदैवाने ही बस पुढे निघून गेली आणि त्या कारमध्येच हा स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या स्फोटात कारचा चक्काचूर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीआरपीएफच्या 6-7 बसचा ताफा निघाला होता. त्यामध्ये जवळपास 40 जवान […]
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर पुलवामासारखा हल्ला होता होता राहिला. स्फोटकाने भरलेल्या एका कारने सीआरपीएफच्या बसला मागून धडक दिली. मात्र सुदैवाने ही बस पुढे निघून गेली आणि त्या कारमध्येच हा स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या स्फोटात कारचा चक्काचूर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीआरपीएफच्या 6-7 बसचा ताफा निघाला होता. त्यामध्ये जवळपास 40 जवान होते. मात्र सुदैवाने कोणत्याही जवानाला दुखापत झाली नाही.
भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वीच पुलवामा हल्ल्यासारखी घटना घडू शकते, असा अलर्ट दिला होता.
दरम्यान, आजचा स्फोट बनिहाल बोगद्याजवळ झाला. एक सँट्रो कार महामार्गावर उभी होती. सीआरपीएफचा ताफा जवळ येताच, या कारमध्ये स्फोट झाला. या कारमध्ये कोणीही नव्हतं. कारचालक फरार झाल्याने सुरक्षा संस्थांची शंका आणखी अधोरेखित झाली. सध्या या कारचालकाचा शोध सुरु आहे.
CRPF: Today around 1030 hrs, an explosion took place in a civil car near Banihal, J&K while CRPF convoy was on move. The car caught fire & slight damage was caused in the rear of one of the CRPF vehicle. No injuries were caused to CRPF Personnel. Incident being investigated. pic.twitter.com/NmvPuPO2df
— ANI (@ANI) March 30, 2019
सुरुवातीला हा कारमधील सिलेंडर स्फोट असावा अशी सर्वांची धारणा झाली. कारचं छत हवेत उडालं. मात्र त्याचवेळी ड्रायव्हर गायब झाला. सीआरपीएफचा ताफा या कारपासून लांब होता. मात्र हा स्फोट इतका भीषण होता की, लांबवर असूनही सीआरपीएफच्या एका बसला किरकोळ नुकसान झालं. सध्या सुरक्षा रक्षकांनी या परिसराची घेराबंदी केली असून कसून तपास सुरु आहे.
पुलवामा हल्ला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती.
14 फेब्रुवारीला श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी हायवेवर गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोटकं भरुन त्यात हा स्फोट घडवून आणला. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
संबंधित बातम्या
दोन-तीन महिन्यात पुन्हा पुलवामासारखा हल्ला: राज ठाकरे
पुलवामातील बलिदान ना विसरलो, ना विसरणार : अजित डोभाल
ऑपरेशन थंडरबोल्ट : घरात घुसून मारणं याला म्हणतात!
पाकिस्तानी विमानांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न, वायूसेना हायअलर्टवर