जेठालाल तारक मेहता कार्यक्रमातील सर्वात महागडा कलाकार!

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमाबद्दल सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. या कार्यक्रमातील प्रमुख भूमिकेतील अभिनेत्री दिशा वकानी म्हणजेच दया बेन यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला आहे आणि सोनू म्हणजेच निधी भानुशालीनेही अभ्यास करण्यासाठी कार्यक्रम सोडल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. अभिनेत्री दिशा वकानी हिने कार्यक्रमात काम करण्यासाठी […]

जेठालाल तारक मेहता कार्यक्रमातील सर्वात महागडा कलाकार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमाबद्दल सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. या कार्यक्रमातील प्रमुख भूमिकेतील अभिनेत्री दिशा वकानी म्हणजेच दया बेन यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला आहे आणि सोनू म्हणजेच निधी भानुशालीनेही अभ्यास करण्यासाठी कार्यक्रम सोडल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. अभिनेत्री दिशा वकानी हिने कार्यक्रमात काम करण्यासाठी शूटींगच्या वेळेसह पैशासंदर्भात काही अटी ठेवल्या होत्या. मात्र या अटी मान्य न झाल्याने दिशाने कार्यक्रम सोडला. नुकतंच कार्यक्रमातील कलाकारांचे मानधन वाढवण्यात आलं आहे. या मानधनात सर्वात महागडा कलाकार म्हणून जेठलाल म्हणजेच दिलीप जोशी ठरले आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मामधील सर्वात महागडा कलाकार म्हणून दया बेनचे पती आणि टपू के पापा जेठलाल ठरले आहेत. या नवीन पॅकेजनुसार दिलीप जोशी यांना एका एपिसोडचे एक लाख 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. या मालिकेतील दोन प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दया बेन, जेठा लाल या दोघांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे. तसेच हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून आतापर्यंत दया बेन आणि जेठालाल यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

दिशा वकानी जेव्हा कार्यक्रमात काम करत होती तेव्हा तिला एका भागासाठी एक लाख 20 हजार रुपये मानधन दिले जात होते. त्यानंतर निर्मात्यांनी दिशाला 50 हजार रुपये वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने दिशाने कार्यक्रमातून काढता पाय घेतला. सध्या तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमातील प्रत्येक महिला कलाकारांना 30 ते 35 हजार रुपये प्रती भाग मिळतात.

कार्यक्रमातील कलाकारांची फी

कार्यक्रमात तारक मेहताची भूमिका साकारणारे कवी शैलेश लोढा यांना प्रत्येक भागासाठी एक लाख रुपये ठरवून दिले आहेत. तसेच अय्यर भाईची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे आणि गुरुचरण सिंह सोढी यांना 65 ते 80 हजार रुपयांपर्यंत दिले जातात. बाबूजी, चंपक लाल म्हणजेच अमित भट्ट याला प्रत्येक भागासाठी 70 ते 80 हजार, आत्माराम भिडे म्हणजे मंदार चंदावरकरला 80 हजार, अब्दुल म्हणजे शरद संकला 35 ते 40 हजार, डॉक्टर हाथी म्हणजे निर्मल सैनीला 20 ते 25 हजार आणि टप्पू सेनाच्या प्रत्येक सदस्याला 20 हजार रुपये प्रति एपिसोड दिले जातात.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.