Bihar Politics | सत्तास्थापनेच्या ‘जुगाडा’साठी काँग्रेस-राजदसोबत जाणार का? मांझींचा मोठा निर्णय

हिंदुस्थानी आवाम मोर्चा (हम) सेक्युलरचे प्रमुख जीतन राम मांझी यांना चार सदस्यीय विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले

Bihar Politics | सत्तास्थापनेच्या 'जुगाडा'साठी काँग्रेस-राजदसोबत जाणार का? मांझींचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 11:23 AM

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी आपला पक्ष ‘हिंदुस्थानी आवाम मोर्चा’ (HAM) एनडीएसोबतच (NDA) राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी जेडीयू नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनाच आमचं समर्थन असून यापुढेही ते कायम राहील, असं मांझींनी स्पष्ट केलं. बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर (Bihar Assembly Election 2020) मांझींच्या पक्षाला कांग्रेस-राजद महागठबंधनने सोबत येण्याची ऑफर दिल्याचं वृत्त होतं. (Jitan Ram Manjhi clarifies HAM will stay with Nitish Kumar and NDA)

याआधी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा (हम) सेक्युलरचे प्रमुख जीतन राम मांझी यांना गुरुवारी चार सदस्यीय विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले होते. त्यानंतर मांझींनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना राज्याच्या प्रगतीसाठी एनडीएमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. “वैयक्तिकरित्या मी सांगतो, की काँग्रेसच्या आमदारांनी नितीश कुमार यांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना समर्थन दिले पाहिजे” असं मांझी म्हणाले होते.

काँग्रेस-राजद यांच्या महागठबंधनकडून जीतन राम मांझी यांच्या ‘हम’ तसेच मुकेश साहनी यांच्या ‘व्हीआयपी’ पक्षाला एनडीएची साथ सोडून महागठबंधनमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला जाईल, जेणेकरुन महागठबंधनला सत्तास्थापनेचा ‘जुगाड’ करता येईल, अशी अटकळ होती.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला 125 जागांवर विजय मिळाला आहे. यासह त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक 122 चा बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. त्यामुळे एनडीएचंच सरकार स्थापन होणार अशीच शक्यता आहे. मात्र, त्यात राजद-काँग्रेसच्या हालचालींनी राजकारण तापलं आहे. राजदच्या नेतृत्वातील महागठबंधनला 110 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. असं असलं तरी दोन्हींच्या मतांच्या टक्केवारीत फार कमी फरक आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधनचं सरकार बनता बनता राहिल्याचं बोललं जातंय.

मांझींचा राजकीय प्रवास

जीतन राम मांझी यांनी 1980 मध्ये काँग्रेसमधून आपला राजकीय प्रवास सुरु केला. तिथून आधी ते राजद आणि नंतर जेडीयूमध्ये गेले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूचा दारुण पराभव झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मांझींना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली. (Jitan Ram Manjhi clarifies HAM will stay with Nitish Kumar and NDA)

नितीश कुमार यांना पदावर परत आणण्यासाठी मांझींना जेडीयूतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर मांझींनी ‘हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलर’ पक्षाची स्थापना केली. बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या आधी ते विरोधीपक्षांच्या महागठबंधनमध्ये होते. मात्र महागठबंधन समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने मांझी यांनी निवडणुकीपूर्वी एनडीएत प्रवेश केला.

जेडीयूने एनडीएत जागावाटपाच्या अंतर्गत असलेल्या 122 जागांपैकी ‘हम’ला सात जागा दिल्या, त्यापैकी त्यांच्या पक्षाने चार जागा जिंकल्या. मांझी म्हणाले की, एकदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर ते आता नितीशकुमार यांच्या नेतृत्वात असलेल्या नव्या सरकारमध्ये मंत्री होणार नाहीत.

संबंधित बातम्या :

बिहारच्या मुख्यमंत्रिपदापासून ’12’ पाऊलं दूर, तेजस्वी यादवांची पाटण्यात आमदारांसोबत बैठक

जीतन राम मांझी यांची काँग्रेस आणि राजदला ऑफर, बिहारमधील राजकारण तापलं

(Jitan Ram Manjhi clarifies HAM will stay with Nitish Kumar and NDA)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.