आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’ला ब्राह्मण आणि करणी सेनेचा विरोध

एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या आर्टिकल 15 चित्रपटाला नागपूरमध्ये प्रदर्शनादरम्यान ब्राह्मण आणि करणी सेनेने जोरदार विरोध दर्शवला आहे. नागपूरमधील काही ठिकाणी करणी आणि ब्राह्मण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात घुसून चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

आयुषमान खुरानाच्या 'आर्टिकल 15'ला ब्राह्मण आणि करणी सेनेचा विरोध
Namrata Patil

| Edited By: Team Veegam

Jun 28, 2019 | 2:34 PM

नागपूर : बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा बहुप्रतिक्षित आर्टिकल 15 (Article 15) या चित्रपट आज (28 जून) नुकताच प्रदर्शित झाला. एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला नागपूरमध्ये प्रदर्शनादरम्यान ब्राह्मण आणि करणी सेनेने जोरदार विरोध दर्शवला आहे. नागपूरमधील काही ठिकाणी करणी आणि ब्राह्मण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात घुसून चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत हा प्रयत्न हाणून पाडला.

अनुभव सिन्हा दिगदर्शित आर्टिकल 15 हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच याला करनी सेना आणि ब्राह्मण सेना यासारख्या संघटनेने विरोध दर्शवला होता. या चित्रपटातील कथा आणि संवादावर या संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यास चित्रपट बंद पाडू असा इशारा या संघटनांनी दिला होता.

दरम्यान आज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या संघटनांनी थेट नागपुरातील काही चित्रपटगृहात धडक दिली. काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र चित्रपटगृहाबाहेरील पोलिसांनी तात्काळ या सर्वांना ताब्यात घेतलं.

आर्टिकल 15 हा चित्रपट भारतीय संविधानातील कलम 15 वर तयार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे झालेल्या बलात्कार प्रकरणावर हा चित्रपट आधारित आहे. तेथील दोन मुलींवर सामूहिक बलात्कार करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. मात्र याप्रकरणी कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे सांगत सीबीआयने हे प्रकरण दडपले. पोलिसांवर उच्चवर्गाकडून दबाव आल्यानेच हे प्रकरण दडपले गेल्याची टीकाही करण्यात आली. यावर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

या चित्रपटात आयुषमानने एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकरली आहे. तर आयुष्यमानसोबत या चित्रपटात इशा तलवार, सयानी गुप्ता, कुमूद मिश्रा यांसारखे अनेक कलाकारही स्क्रीन शेअर केली आहे. तसेच या चित्रपटाला चित्रपट समीक्षकांनही तीन ते चार स्टार दिले आहेत.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें