एका घरात दोनपेक्षा जास्त कुत्रे पाळण्यास बंदी, नागपूर पालिकेचा निर्णय

शहरात कुत्र्यांचा हैदोस वाढतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी पाहता नागपूर महापालिकेने आता नवीन धोरण आणण्याचा विचार केला आहे.

एका घरात दोनपेक्षा जास्त कुत्रे पाळण्यास बंदी, नागपूर पालिकेचा निर्णय
फोटो प्रातिनिधीक

नागपूर : शहरात कुत्र्यांचा हैदोस वाढतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी पाहता नागपूर महापालिकेने आता नवीन धोरण आणण्याचा विचार केला आहे (Abandoned Dogs). या नवीन धोरणानुसार, आता नागपूरकरांना एका घरात दोनच कुत्रे पाळता येणार आहेत. लवकरच याची अंमलबजवणी करण्यात येणार आहे (Abandoned Dogs).

नागपूर महापालिकेच्या हद्दीत बेवारस कुत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिकडे-तिकडे या बेवारस कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतो. यावर महापालिकेने उपाय योजना म्हणून नस बंदीचा कार्यक्रम आखला. मात्र, त्याचा पाहिजे तसा फायदा झाला नाही. बेवारस कुत्र्यांमुळे नागपूरकरांना मनस्ताप झाला आहे. नागरिकांचा त्रास वाढत आहे. सोबतच अनेकजणांना कुत्रे पाळण्याची आवड असते. मात्र, काही जण एक नाही तर दोन-तीन कुत्रे पाळतात. जेव्हा या कुत्र्यांचं वय वाढतं, त्यांना कुठला आजार होतो किंवा इतर कुठल्याही कारणाने त्यांना बेवारस सोडलं जातं. त्यामुळे शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या वाढते आहे. अनेक ठिकाणी ही बेवारस कुत्री अपघाताला कारणीभूत ठरतात. तसेच, नागरिकांना या कुत्र्यांपासून धोकाही असतो, शहरात गेल्या काही दिवसांत कुत्रे चावण्याच प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका ही उपाय योजना धोरण म्हणून अंमलात आणण्याच्या तयारीत आहे.

त्याशिवाय, घरगुती पाळीव कुत्र्यांना त्यांचे मालक रस्त्यावर घेऊन फिरतात, त्यामुळे त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने नागपूरकर हैराण झाले आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.

बेवारस कुत्रे आणि पाळीव कुत्र्यांच्या या समस्येवर उपाय योजना म्हणून महापालिकेने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नवीन धोरण आखलं जात आहे. त्यानुसार, एका मालकाला आपल्या घरात दोन पेक्षा जास्त कुत्री पाळता येणार नाहीत. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक तयारी झाली असून त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे. मात्र, प्राणी प्रेमी पालिकेच्या या निर्णयाला विरोध करण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI