राऊत म्हणाले, ‘हे राष्ट्रावर उपकारच झाले!’, सोमय्या म्हणतात ‘आभारी आहे, लवकरच उत्तर देणार’

संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचं आवाहन त्यांनी सोमय्यांना केलं आहे. या पत्रात राऊत यांनी सोमय्या यांच्यावर खोचक टीकाही केलीय. राऊत यांच्या या टीकेला लवकरच उत्तर देणार असल्याचं आता सोमय्या म्हणाले. इतकंच नाही तर सोमय्या यांनी राऊतांचे आभारही मानले आहेत.

राऊत म्हणाले, 'हे राष्ट्रावर उपकारच झाले!', सोमय्या म्हणतात 'आभारी आहे, लवकरच उत्तर देणार'
संजय राऊत, किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 2:35 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पक्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तसंच हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचं आवाहन त्यांनी सोमय्यांना केलं आहे. या पत्रात राऊत यांनी सोमय्या यांच्यावर खोचक टीकाही केलीय. राऊत यांच्या या टीकेला लवकरच उत्तर देणार असल्याचं आता सोमय्या म्हणाले. इतकंच नाही तर सोमय्या यांनी राऊतांचे आभारही मानले आहेत. (Kirit Somaiya’s reply to Shivsena MP Sanjay Raut’s allegation of PCMC scam)

‘माननीय संजय राऊत यांनी माझा “भ्रष्टाचार विरोधी मिशनचे कौतुक केले, मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचारविरुद्धच्या आपल्या लढ्यास ‘बळ’ मिळावे…” मी काही दिवसांत त्यांना उत्तर पाठविणार’, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी राऊत यांना पाठवलेल्या पत्राचा एक फोटोही शेअर केलाय.

संजय राऊतांचा नेमका आरोप काय?

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला आहे. ईडी, सीबीआय आणि सोमय्यांनी चौकशीसाठी पुढाकार घ्यावा, असं आव्हान राऊत यांनी पत्राद्वारे केलाय. पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरावा करतील, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केलीय.

एक भ्रष्टाचाराचं प्रकरण माझ्या निदर्शनास आलं असून ते अत्यंत गंभीर आहे. त्यात तुम्ही लक्ष घालावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर नगरसेविका सुलभा उबाळे आणि अन्य काही नगरसेविकांनी काही कागदपत्रं दिली. त्यातून असं दिसून येतं की पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाल्या. तुम्ही हा घोटाळा उघडकीस आणावा, अशी मी विनंती आहे. 2018 – 2019 या काळात काही कोटींचा घोटाळा स्मार्ट सिटी प्रकल्पात झाल्याचंही सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या : 

‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Video : महापालिकेनं बनवलेला सायकल ट्रॅक नगरसेवकानं उखडून टाकला! नेमकं कारण काय?

Kirit Somaiya’s reply to Shivsena MP Sanjay Raut’s allegation of PCMC scam

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.