1 जानेवारीपासून हे पाच नवे बदल होणार!

1 जानेवारीपासून हे पाच नवे बदल होणार!

मुंबई : तुम्ही सकाळी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेलात आणि तुमचं कार्ड बंद पडलंय असं सांगितलं तर? होय, असं होऊ शकतं. कारण, नव्या वर्षात काही नियमांमध्ये बदल होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेत, बँकांनी जुने कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्ड बदलून घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या नियमासोबतच इतर नियमही 1 जानेवारीपासून […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : तुम्ही सकाळी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेलात आणि तुमचं कार्ड बंद पडलंय असं सांगितलं तर? होय, असं होऊ शकतं. कारण, नव्या वर्षात काही नियमांमध्ये बदल होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेत, बँकांनी जुने कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्ड बदलून घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या नियमासोबतच इतर नियमही 1 जानेवारीपासून बदलणार आहेत.

जुने एटीएम कार्ड बंद होणार

काही डेबिट आणि क्रेडिट कार्ड 1 जानेवारीपासून बंद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड 31 डिसेंबरपर्यंत ईएमव्ही चीपने बदलण्याचे निर्देश जारी केले आहेत. आरबीआयने 27 ऑगस्ट 2015 रोजी एक आदेश जारी करत बँकांना कार्ड बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली होती. 1 सप्टेंबर 2015 पासून जारी केले जाणारे सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड ईएमव्ही चीपचे असतील, असं आरबीआयने स्पष्ट केलं होतं. बँकेकडूनही ग्राहकांना कार्ड बदलण्यासाठी मेसेज केला जात आहे. वाचा सविस्तर1 जानेवारीपासून हे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होणार!

नॉन-CTS चेकबूक बंद होणार

1 जानेवारी 2019 पासून नॉन सीटीएस (चेक ट्रंकेशन सिस्टम) चेक बंद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन महिन्यांपूर्वी याबाबत आदेश जारी केला होता. सीटीएस अंतर्गत एक इलेक्ट्रिक इमेज कॅप्चर होते, ज्यामुळे चेक एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पाठवण्याची गरज पडत नाही. तर नॉन सीटीएस चेक कम्प्युटरद्वारे रिड केले जातात. यामुळेच चेक क्लिअर होण्यासाठीही जास्त वेळ लागतो. पण आता चेकचा व्यवहारही जलद होणार आहे.

एसबीआयची ‘ही’ ऑफर संपणार

नव्या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका खास ऑफरचा फायदा घेता येणार नाही. गृहकर्ज घेण्यासाठी एसबीआयमध्ये तुम्ही 31 डिसेंबरपूर्वीच अर्ज केला असेल तर प्रोसेसिंग फीस लागणार नाही. मात्र यासाठी उशिर झाला असेल तर प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे.

आयटीआर भरायला उशिर करु नका

2017-18 या आर्थिक वर्षात लेट फीससह आयटी रिटर्न भरला नसेल, तर दुप्पट रक्कम भरावी लागू शकते. आयटी रिटर्न भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत आयटीआर भरण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र अनेकांनी ही तारीख ओलांडली. अशा लोकांसाठी पाच हजार रुपये दंडासह 31 डिसेंबरपर्यंतची मुभा देण्यात आली होती. ही डेडलाईनही चुकवली असेल तर आणखी पाच हजार म्हणजे एकूण दहा हजार रुपये दंड भरावा लागेल.

प्री जीएसटी डिस्काऊंट बंद

नव्या वर्षात प्री जीएसटी वस्तूंवर मिळणारा डिस्काऊंट बंद होणार आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी तयार झालेल्या वस्तू विकण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे ज्या दुकानदारांकडे जुन्या वस्तू होत्या, ते स्टॉक क्लिअरन्ससाठी डिस्काऊंट देत होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें