ट्रॅक्टर नदीत कोसळला, सात महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू

पुलावरुन ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात महिला कामगारांचा मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावर ही दुर्देवी घटना घडली आहे.

ट्रॅक्टर नदीत कोसळला, सात महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 1:42 PM

बेळगाव : पुलावरुन ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात महिला कामगारांचा मृत्यू झाला (Tractor Accident). खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावर ही दुर्देवी घटना घडली आहे. 15 हून अधिक महिला ऊसतोड कामगार ट्रॅक्टरवरुन आज सकाळी बोगुर गावातून इटगीकडे जात होत्या. मात्र, बोगुर पुलावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला (Belgaon Tractor Accident).

या अपघातात सात महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक महिला कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही दुर्घटना नंदगडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिची मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. या घटनेत तंगव्वा हुंचेन्नत्ती, अशोक केदारी, शांतवा अल्गोडी, गुलाबी हुंचीकट्टी, नागाव्वा मातोळे, शांतव्वा बिझोरे, नीलव्वा मुत्नाळ यांचा मृत्यू झाला आहे..

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.