‘कुछ कुछ होता है’ फेम परझान दस्तुर विवाहबंधनात अडकणार

अभिनेता परझान दस्तुरने गर्लफ्रेंड देल्ना श्रॉफला प्रपोज केल्यानंतर तिने होकार दिला. या क्षणाचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे

'कुछ कुछ होता है' फेम परझान दस्तुर विवाहबंधनात अडकणार
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 11:12 AM

मुंबई : ‘तुस्सी जा रहे हो… तुस्सी ना जाओ’ या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील एका डायलॉगमधून लोकप्रिय झालेला चिमुरडा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेता परझान दस्तुर पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड देल्ना श्रॉफसोबत त्याचं लग्न ठरलं आहे. (Kuch Kuch Hota Hai’s cute little sardaar Parzaan Dastur to get married in February 2021)

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात समर कॅम्पमध्ये दिसलेला चिमुकला सरदार आजही अनेकांच्या लक्षात आहे. परझान दस्तुर त्यानंतर अनेक जाहिराती, मालिका, सिनेमे केले, मात्र त्याची आठवणीतली भूमिका ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातीलच राहिली.

गर्लफ्रेंड देल्ना श्रॉफला प्रपोज केल्यानंतर तिने होकार दिला. या क्षणाचा फोटो परझानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बीचवर गुडघे टेकून बसलेला परझान आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहणाऱ्या देल्नाला पाहून चाहतेही आनंदी झाले.

परझानने 2009 मध्ये पहिल्यांदाच चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. फूटबॉलपटू होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या युवकाचे आयुष्य बंदूक सापडल्यानंतर कसे उलथपालथ होते, हे कथानक असलेल्या ‘सिकंदर’मध्ये तो झळकला. तर मधू या सिनेमातही त्याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

‘हम तुम’ या सैफ अली खान-राणी मुखर्जीच्या चित्रपटात परझान ‘हम’ या कार्टून कॅरेक्टरचा आवाज झाला होता. परझानने पॉकेट मम्मी या शॉर्टफिल्मची निर्मितीही केली.

संबंधित बातम्या :

‘कुछ कुछ होता है’मधील ‘हा’ चिमुकला सध्या काय करतो?

ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवे विवाहबंधानात, 65 व्या वर्षी पुन्हा लग्नाची बेडी

(Kuch Kuch Hota Hai’s cute little sardaar Parzaan Dastur to get married in February 2021)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.