पुलवामानंतर मोदींनी म्हटलेल्या ‘त्या’ कवितेला लता दीदींचा आवाज

पुलवामानंतर मोदींनी म्हटलेल्या 'त्या' कवितेला लता दीदींचा आवाज

मुंबई : प्रसिद्ध गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ या कवितेला आपला आवाज दिला आहे. त्यांनी गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. गाण्याच्या सुरुवातीला सर्वात पहिले लता मंगेशकर यांचा आवाज ऐकू येतो.

गाण्याच्या सुरुवातीला लता मंगेशकर म्हणाल्या, “नमस्कार काही दिवसांपूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं होतं. त्यावेळी त्यांनी एक कविता म्हटली होती. ती कविता प्रत्येक भारतीयांच्या मनातील गोष्ट आहे, असं मला वाटतं. ती कविता मलाही खूप आवडली आणि मी ती रेकॉर्ड केली. आज आपल्या देशातील वीर जवान आणि जनता यांच्यासाठी मी शेअर करते. जय हिंद”.


या व्हिडीओला उत्तर देत नरेंद्र मोदी म्हटले की, “ह्रदयापासून निघालेले तुमचे प्रत्येक शब्द माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आणि आशीवार्द आहे”.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. यामध्ये अभिनेता विवेक ऑबेरॉयने नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं पहिलं गाणंही ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ यावर तयार करण्यात आलं आहे. 23 मार्चला हे गाणं प्रदर्शित केले होते.

पाकिस्तानमधील बालाकोटवर एअरस्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही कविता सादर केली होती. राजस्थानच्या चुरुमध्ये एका सभेत मोदींनी ही कविता सादर केली होती. त्यावेळी मोदी म्हणाले, “भारताच्या वीर जवानांना नमन करतो आणि आज पुन्हा सांगतो. सौगंध मुझे इस मिट्टी की, मै देश नही मिटने दुंगा, मै देश नही रुकने दुंगा, मै देश नही झुकने दुंगा. हे माझं वचन आहे भारतमातेला”.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI