कागदपत्रांची पूर्तता करुनही जात प्रमाणपत्र नाही, इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने इंजिनिअरिंग पदवी घेतलेल्या एका युवकाने आत्महत्या केली (latur student suicide)आहे.

कागदपत्रांची पूर्तता करुनही जात प्रमाणपत्र नाही, इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

लातूर : जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने इंजिनिअरिंग पदवी घेतलेल्या एका युवकाने आत्महत्या केली (latur student suicide)आहे. सहदेव महांडुळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जात प्रमाणपत्र मिळाले तर नोकरी मिळेल या आशेने त्याने पदवी घेतली होती. मात्र अनेकदा जात प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करुनही ते मिळत नव्हते. याच कारणामुळे सहदेव यांनी लातूर जिल्ह्यातील पाखरंसांगवी या ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

सहदेवने पुण्यातून इंजिनिअरींगची पदवी घेतली होती. महादेव-कोळी म्हणून जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्याने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. गेल्या 6 वर्षांपासून तो जात पडताळणी कार्यालयाकडे पाठपुरावा करत होता. मात्र औरंगाबाद जात पडताळणी समितीने त्याचे जात प्रमाणपत्र काही दिवसांपूर्वीच फेटाळले होते. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता.

जात पडताळणी समितीच्या या निर्णयामुळे त्याचं कुटुंबही मानसिक तणावाखाली आले होते. सहदेवच्या शिक्षणाचा पाच वर्षांचा खर्च आणि कॉलेजची फी भरताना त्याच्या वडिलांना असलेलं थोडं-थोडकं शेतही विकावे लागले. जर जात प्रमाणपत्र वैध झाले असते, तर त्याच्या शिक्षणाचा खर्च सरकारी कोट्यातून झाला असता. तो पात्र असूनही जात प्रमाणपत्र मिळणार नाही. या कारणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड तणावाखाली होता. या कारणामुळे त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने त्याचं कुटुंब दुःखात बुडाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून कोळी समाजातल्या बहुतांश तरुणांची महादेव-कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपड सुरु असते. एसटी प्रवर्गाला असलेलं आरक्षण नोकरी मिळवताना उपयोगी पडत असे म्हटलं जाते. सहदेवच्या आत्महत्येनंतर त्याचे कुटुंबीय औरंगाबाद जात पडताळणी समितीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत (latur student suicide) आहेत .

Published On - 3:25 pm, Sat, 11 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI