लातूर बस स्थानकात भिकाऱ्यांना पोलिसाची मारहाण, व्हिडीओ व्हायरल

या व्हीडिओत रात्री बस स्थानकात ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी झोपलेल्या भिकाऱ्यांना बेदम मारहाण करत असल्याचं दिसतं आहे

लातूर बस स्थानकात भिकाऱ्यांना पोलिसाची मारहाण, व्हिडीओ व्हायरल

लातूर : लातूर बस स्थानकात झोपलेल्या भिकाऱ्यांना पोलीस मारहाण करत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत रात्री बस स्थानकात ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी झोपलेल्या भिकाऱ्यांना बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे (Police Beat Beggars). लातूर पोलिसांचा हा प्रताप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अशा प्रकारे भिकाऱ्यांना मारहाण केल्याने लातूर पोलिसांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत (Police Beat Beggars).

भिकाऱ्यांना मारताना एखादा प्रवासी देखील मारहाणीत सापडला तरी पोलिसांना त्याची दया वाटत नाही, पोलीस त्यालाही मारहाण करतात, असा आरोप करण्यात येत आहे. तर, खिसे-कापू, चोरटे यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बस स्थानकातील भिकाऱ्यांना मारहाण करत असल्याचा प्रतिदावा केला जात आहे.

यात बिचाऱ्या त्या भिकाऱ्यांचा काय दोष, पोलीस या भिकाऱ्यांना दम देऊन किंवा समज देऊन स्थानकाबाहेर हुसकावून लावू शकले असते. मात्र, पोलिसांनी अशाप्रकारे मारहाण करणे चुकीचे असल्याचं बोललं जात आहे.

मारहाण झालेले नेमके कोण, हे अद्याप पुढे आलेलं नाही. तसेच, या पोलिसांविरोधा अद्याप कुठली तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. तरी भिकाऱ्यांना पोलिसांकडून होणारी ही मारहाण चुकिची असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI