खोकल्याच्या उपचारासाठी डॉक्टरकडे, 10 वर्षीय मुलाच्या पोटात निघाला LED बल्ब

फरीदाबादमधील एका 10 वर्षाच्या मुलाच्या पोटात एलईडी बल्ब सापडला (LED bulb in boy stomach) आहे.

खोकल्याच्या उपचारासाठी डॉक्टरकडे, 10 वर्षीय मुलाच्या पोटात निघाला LED बल्ब

चंदीगड (हरयाणा) : फरीदाबादमधील एका 10 वर्षाच्या मुलाच्या पोटात एलईडी बल्ब सापडला (LED bulb in boy stomach) आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. अभिषेक असं या लहान मुलाचं नाव आहे. या लहान मुलाला कुणीतरी एक खेळणे दिले होते. ज्यामध्ये एलईडी बल्ब होता. खेळताना त्याने ते खेळणे तोंडाला लावले होते. त्यामुळे नकळत त्याच्या पोटात एलईडी बल्ब गेला, असा अंदाज डॉक्टरांनी (LED bulb in boy stomach) वर्तवला आहे.

गेल्या काहीदिवसांपासून मुलाल खोकला येत होता. तसेच त्याचा गळा आणि छाती दुखत होती. त्यासोबत त्याला तापही आला होता. यावेळी त्याला कफ सिरप प्यायला दिले. पण तरीही खोकला न थांबल्यामुळे मुलाल सर्वोदय रुग्णालयात नेण्यात आले. हे रुग्णालय फरीदाबादच्या सेक्टर 8 मध्ये आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलाचे एक्सरे काढले. ज्यामध्ये अभिषेकच्या श्वसन नलिकेत आणि फुफ्फुसांमध्ये काहीतरी वस्तू अडकली आहे. त्यानंतर मुलाला एनिस्थीसियाचे कमी डोस देऊन तोंडा वाटे डिव्हाईस टाकून अडकलेली वस्तू काढण्यात आली. यानंतर डॉक्टर आणि अभिषेकच्या कुटुंबियांना समजले की, मुलाच्या फुफ्फुसांमध्ये एलईडी बल्ब फसला होता. त्यामुळे त्याला त्रास होत होता.

दरम्यान, लहान मुलांना आपण कोणतीही वस्तू खेळायला देतो. त्यामुळे त्याला त्याचा त्रासही होऊ शकतो. अशामध्ये पालकांनी मुलं कोणत्या खेळण्यासोबत खेळत आहेत यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI