LIVE : मेडिकल प्रवेश आरक्षणाबाबत सरकार अध्यादेश काढणार – सूत्र

LIVE :  मेडिकल प्रवेश आरक्षणाबाबत सरकार अध्यादेश काढणार - सूत्र

[svt-event title=”मेडिकल प्रवेशाबाबत सरकार अध्यादेश काढणार – सूत्र” date=”15/05/2019,3:58PM” class=”svt-cd-green” ] मेडिकल प्रवेश मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती, निवडणूक आयोगाला अध्यादेश काढण्यासंदर्भात सरकारची विनंती, पूर्वलक्षी प्रभावाने प्रवेश मिळण्यासंदर्भात राज्य सरकार अध्यादेश काढणाच्या तयारीत [/svt-event]

[svt-event title=”मेडिकलचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम” date=”15/05/2019,3:30PM” class=”svt-cd-green” ] बैठकी मध्ये काहीही भेटले नाही, त्यामुळे आमचे आंदोलन सुरूच राहील. आमची मागणी आहे की आम्हाला ज्या कॉलेजमध्ये सीट मिळाली होती तीच कायम राहावी. तसेच आमच्या कॉलेजमध्ये बदल होऊ नये हीच मागणी आहे. अडमिशनमध्ये अंतिम तारीख वाढावी अशी आमची मागणी नव्हती. आम्हाला सरकारकडून काही लेखी स्वरूपात मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन माघार घेणार नाही. सरकार आमच्या मागण्यांवर गंभीर दिसत नाही. [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया ” date=”15/05/2019,3:33PM” class=”svt-cd-green” ] मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर ही पहिली अॅडमिशन प्रक्रिया आहे. कायदा आगोदर झाला आहे आणि अॅडमिशन प्रक्रिया परत चालू झाली आहे. तसेच स्टे नसल्या कारणाने अॅडमिशन प्रक्रियांचे दोन राऊंड झाले. ठोस निर्णय घेण्याबाबतीत आमची चर्चा झाली. हे शासन या मुलांचे नुकसान होऊ देणार नाही. तसेच या मुलांचे कायद्याच्या चौकटीत काही नुकसान होऊ नये यासाठी सरकार पावले उचलत आहे. कायद्याचा अभ्यास करूनच मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले. मुख्यमंत्री महोदय या विद्यार्थ्यांचे नुकसान हाऊ देणार नाहीत. 30 नोव्हेंबरला कायदा झाला होता परंतु 22 फेब्रुवारी ला अॅडमिशन प्रक्रिया चालू झाली होती. त्यामुळे पूर्वलाक्षीप्रभावाने अॅडमिशन देण्यात येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आणि आमची PIL फेटाळली. [/svt-event]

[svt-event title=”मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच” date=”15/05/2019,3:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार” date=”15/05/2019,1:16PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज रात्री 8 वा वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेणार [/svt-event]

[svt-event title=”संभाजीराजेंचं मेडिकलच्या विद्यार्थ्यांना आश्वासन” date=”15/05/2019,12:17PM” class=”svt-cd-green” ] #मुंबई – मेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आजाद मैदानात दाखल, सरकारशी चर्चा करुन प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन [/svt-event]

[svt-event title=” व्हॉट्सअॅपवर अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाची घरात जाऊन धुलाई” date=”15/05/2019,11:09AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर – व्हॉट्सअॅपवर अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाची घरात जाऊन धुलाई, महिन्याभरापासून मेसेज, महिलेची शिक्षण विभागाकडे तक्रार, शिरोळ तालुक्यातील शिरोळ गावातील घटना [/svt-event]

[svt-event title=”मेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरुच” date=”15/05/2019,11:06AM” class=”svt-cd-green” ] मुंबई – मेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन जैसे-थे, आजही आझाद मैदानात आंदोलन सुरुच, दोन दिवसात निर्णय न झाल्यास जिल्हा पातळीवर (जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार कार्यालय) ठिय्या / धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु करण्याचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”नक्षल्यांनी पुन्हा कोट्यवधीची वाहने जाळली” date=”15/05/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड आणि ओरिसात नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्त्याच्या कामावरील कोट्यवधी रुपयांची वाहने पेटवली, ओरिसात कालाहांडी लगत रस्त्याच्या कामावरील दोन कोटीची अकरा वाहने जाळली, तर दंतेवाडात एक कोटीची चार वाहने पेटवली, 30 एप्रिलपासून नक्षलवाद्यांचं जाळपोळ सत्र सुरुच [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद – उपविभागीय कार्यालयात ट्रॅक्टर चालकाचा गळफास” date=”15/05/2019,10:58AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : कन्नड उपविभागीय कार्यालयात ट्रॅक्टर चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, उपविभागीय अधिकाऱ्याने चालकाचा ट्रॅक्टर जमा केल्याच्या रागातून आयुष्य संपवलं, दोन दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याचा चालकावर आरोप होता [/svt-event]

[svt-event title=”जालना – जालन्यात रानटी कुत्र्यांचा धुमाकूळ, कुत्र्याच्या 5 बकऱ्यांवर हल्ला” date=”15/05/2019,8:07AM” class=”svt-cd-green” ] जालना – जालन्यात रानटी कुत्र्यांचा धुमाकूळ, शरद रामकीसन शेजुळ या शेतकऱ्याच्या 5 बकऱ्यांवर कुत्र्यांचा हल्ला, आठ दिवसांपासून कुत्र्याचा धुमाकूळ, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण [/svt-event]

[svt-event title=”उल्हासनगर : सोन्याची बांगडी चोरणाऱ्या महिला चोराला अटक” date=”15/05/2019,8:03AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगर : सोन्याची बांगडी चोरणाऱ्या महिला चोराला अटक, वृद्ध महिलेला मंदीरात सोडण्याच्या बहाण्याने चोरी, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद, दोन सोन्याच्या बांगड्या हस्तगत [/svt-event]

[svt-event title=”येत्या 4 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार” date=”15/05/2019,7:55AM” class=”svt-cd-green” ] येत्या 4 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार, स्कायमेटचा अंदाज, 22 मे रोजी म्हणजे आठवड्याभरातच अंदमानमध्ये मान्सून [/svt-event]

[svt-event title=”सायन रुग्णालयामध्ये महिलेवर बलात्कार” date=”15/05/2019,7:52AM” class=”svt-cd-green” ] सायन रुग्णालयामध्ये महिलेवर बलात्कार, एकाला अटक, पाचव्या मजल्यावर अत्याचार [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI