LIVE : यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा

LIVE : यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा

[svt-event title=”यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा” date=”13/01/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन संभाजी ब्रिगेड आक्रमक” date=”13/01/2020,12:22PM” class=”svt-cd-green” ] वादग्रस्त पुस्तक 8 दिवसाच्या आत भाजप ने तात्काळ पाठीमागे घ्यावे. अन्यथा महाराष्ट्रातील एकही भाजप कार्यालय संभाजी ब्रिगेड ठेवणार नाही. भाजप कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. [/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांना लुटून बरबाद करणारे मोदी हे शिवाजी कसे होऊ शकतात? बच्चू कडूंची टीका” date=”13/01/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ] छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारे एक पुस्तक काल (12 जानेवारी) प्रकाशित झाले. या पुस्तकावरुन राजकीय वातवरण तापले आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील या पुस्तकावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. “सात जन्म, सात पिढ्या झिजवून काढले तरी छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना होऊ शकत नाही. तुलनात्मक पुस्तक काढणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अशी तुलना करण अत्यंत चुकीचे आहे. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्याचे हे केवळ पाईक आहे”, असे बच्चू कडू म्हणाले. एकीकडे शेतकऱ्यांच्या देठालाही हात लावू नका म्हणणारे छत्रपती आणि दुसरीकडे अख्खा शेतकरी लुटून बरबाद करणारे मोदी, हे शिवाजी महाराज कसे होऊ शकतात? [/svt-event]

[svt-event title=”‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर छत्रपती शिवेंद्रराजे म्हणतात…” date=”13/01/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन ” date=”13/01/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] वाडिया रुग्णालय हे लहान मुलांवर उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या सेवेचा लाभ मुंबईतील रुग्णांनाच नाही तर देशभरातील रुग्णांनाही होतो. रुग्णालय प्रशासन आणि महापालिका/राज्य शासनाच्या वादात हे रुग्णालय बंद करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे लाल बावटा कामगार संघटनेने प्रकाश रेड्डींच्या नेतृत्वात वाडिया मॅटर्निटी रुग्णालयाबाहेर धारणे आंदोलन 3 दिवस छेडण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात हत्यासत्र सुरु, एकाच रात्रीत दोन हत्याकांड ” date=”13/01/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : जिल्ह्यात एकाच रात्रीत दोन हत्याकांड झाल्याने सर्वत्र खळबळ उडालेली आहे. पहिली घटना झिंगाबाई टाकळी परिसरात घडली. ललित खरे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुसरी घटना सावनेरमध्ये घडली. अंगद सिंह या जिम संचालकाची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोन्ही घटनेचा तपास करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सहा महिन्यानंतर सुरु होणार भोर घाट” date=”13/01/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] रायगड : सहा महिन्यानंतर आता भोर घाट सुरु करण्यात येत आहे. येत्या गुरुवारी (16 जानेवारी) वाहतुकीसाठी हा घाट खुला होणार आहे. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी घाटाची चाचणी केली जाणार आहे. गेल्यावर्षी पावसाने संरक्षक भिंत कोसळल्याने घाट बंद केला होता. [/svt-event]

[svt-event title=”सीटी बँक अध्यक्ष आनंदराव अडसूळांवर कारवाई करण्याची मागणी” date=”13/01/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ] सीटी बँक अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. पीएमसी बँकेच्या कथीत कर्ज घोटाळ्या प्रकरणी संचालक आणि अधिकाऱ्यांना अटक केली त्याप्रमाणे सिटी बँक अध्यक्ष अडसूळ यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”उल्हासनगरमध्ये गाड्यांची तोडफोड, 10 ते 15 गाड्या फोडल्या” date=”13/01/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगरमध्ये रात्रीच्या सुमारास गाड्यांची तोडफोड करण्यात आली. रिक्षा, चारचाकी अशा 10 ते 15 गाड्यांची तोडफोड झाली आहे. अज्ञाताने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांच्या काच फोडल्या आहेत. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. [/svt-event]

Published On - 8:00 am, Mon, 13 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI