ज्याने लग्न लावलं, त्याच्यासोबत नवरी पळून गेली

भोपाळ मध्यप्रदेश : लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच नवविवाहित तरुणी ब्राह्मणासोबतच पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातील सिरोंजमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दैनिक भास्कर या वृत्तपत्राने याबाबतच वृत्त दिलं आहे. दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार, सिरोंजमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचे बासौदमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न झाले होते. या […]

ज्याने लग्न लावलं, त्याच्यासोबत नवरी पळून गेली
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 6:42 PM

भोपाळ मध्यप्रदेश : लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच नवविवाहित तरुणी ब्राह्मणासोबतच पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातील सिरोंजमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दैनिक भास्कर या वृत्तपत्राने याबाबतच वृत्त दिलं आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार, सिरोंजमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचे बासौदमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न झाले होते. या दोघांचे लग्न विनोद नावाच्या एका ब्राह्मणाने केले होते. मोठ्या थाटामाटात लग्न झाल्यानंतर काही दिवसांसाठी नवविवाहित तरुणी आपल्या माहेरी राहण्यासाठी आली होती.

नवविवाहित तरुणी माहेरी आली असताना, 23 मे रोजी सिरोंजमध्ये एक लग्नसोहळा होणार होता. हे लग्न विनोदच करणार होता. मात्र लग्नाच्या विधी सुरु होण्यापूर्वी विनोद अचानक गायब झाला. यानंतर सर्वांनी ब्राह्मणाची शोध घेण्यास सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यानंतरही विनोद काही सापडला नाही. विशेष म्हणजे लग्नानंतर माहेरपणासाठी आलेली नवविवाहित तरुणीही बेपत्ता असल्याचे तिच्या नातेवाईकांना समजलं.

यानंतर तरुणीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान नवविवाहित तरुणी आणि ब्राह्मण विनोद पळून गेल्याचं पोलिसांना समजलं. तसेच या दोघांचे गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचंही पोलिसांच्या गावातील लोकांनी माहिती दिली

चौकशीसाठी पोलीस विनोदच्या घरी गेले असता, तिथे त्यांना विनोदचे लग्न झाल्याची आणखी एक धक्कादायक गोष्ट समजली. विशेष म्हणजे विनोदला दोन मुलंही असल्याचं पोलिसांना समजलं.

यानंतर पोलिसांनी नवविवाहित तरुणीच्या नातेवाईकांची चौकशी केली असता, तरुणी पळून जाताना आपल्यासोबत दीड लाख रुपयाचे दागिने आणि 30 हजाराची रोख रक्कम घेऊन गेल्याचं सांगितलं. दरम्यान अद्याप विनोद आणि नवविवाहित तरुणी बेपत्ता आहे. सध्या पोलिस या दोघांचा  शोध घेत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.