निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात संशयित दहशवादी पकडला

निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात संशयित दहशवादी पकडला

पुणे: महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे युनिटने चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. हा खलिस्तान समर्थक दहशतवादी असल्याचा संशय आहे. आरोपीकडून देशी बनावटीची बंदूक आणि पाच राऊंड जप्त केले आहेत. त्याच्यावर UAPA कायद्यातंर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाच्या पुणे युनिटला एक व्यक्ती चाकण इथे शस्त्रास्त्र घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पुणे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून संशयित व्यक्तीला अटक केली. त्याची झडती घेतली असता, एक देशी बनावटीचे पिस्तुल, राऊंड आणि काही पैसे आढले.

ही व्यक्ती कर्नाटकातील बेल्लारी इथला रहिवासी आहे. मात्र तो मूळचा पंजाबमधील रोपर इथला आहे. तो स्वतंत्र खलिस्तान राष्ट्र निर्मितीचा समर्थक आहे. ही व्यक्ती स्वतंत्र खलिस्तान निर्मितीसाठी तयारी करत होता. यासाठी तो पाकिस्तानसह देशविदेशातील अनेक दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. हा व्यक्ती आणि त्याचे साथीदार यांनी दहशतवाद्यांची टोळी बनवून भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला धोका निर्माण करण्याची तयारी केली होती. यामुळे त्याच्याविरोधात यूएपीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI