यंदा गरब्याची धूम नाही, दांडियाचं आयोजन नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे आदेश

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दूर्गापूजा तसंच दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra Goverment issues Guidelines On Navratra Festival)

यंदा गरब्याची धूम नाही, दांडियाचं आयोजन नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे आदेश
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 7:00 PM

मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दूर्गापूजा तसंच दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यंदा गरब्यावर बंदी घालण्यात आली आहे तर दांडियाचं आयोजन देखील करता येणार नाही. (Maharashtra Goverment issues Guidelines On Navratra Festival)

यंदाच्या वर्षी गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवून जनजागृती करावी. या माध्यमातून शासनाला सहकार्य करावे, असं आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.

या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तींची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी तसंच पारंपारिक देवीच्या मुर्तींऐवजी घरातील धातूंच्या किंवा संगमरवरी मुर्तीचे पूजन करावे, असं आवाहन शासनाने केलं आहे.

नवरात्रौत्सवाकरिता देणगी स्वच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असं पाहावं. तसंच आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी, असं राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा तेथील स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक आहे. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी फिजिकल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, अशी महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे.

देवीच्या मुर्तींची उंची सार्वजनिक मंडळांकरता 4 फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी, असा महत्वाचा नियम राज्य सरकारने घालून दिला आहे.

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे, असंही सांगण्यात आलं आहे.

कोरोनाच्या काळात विविध धर्मियांनी आपापले सण सण सार्वजनिकरित्या न साजरे करता आपापल्या घरातूनच साजरे केले. नवरात्रौत्सव, दुर्गापूजा तसंच दसरा देखील साध्या पद्धतीने साजरा करून कोरोनाला आळआ घालण्यास शासनाला मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

(Maharashtra Goverment issues Guidelines On Navratra Festival)

संबंधित बातम्या

प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.