महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित! दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात

ज्या चमकत्या शहरांमध्ये राहण्याचं सगळ्यांना आकर्षण असतं अशा मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन महानगरांमध्ये रेड-लाइट क्षेत्राचं मोठं जाळं तयार होत आहे.

महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित! दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 10:10 AM

पुणे : राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाने (NCRB) 2019 मधल्या महिला अत्याचाराच्या घटनांचा धक्कादायक आकडा समोर आणला आहे. यानुसार, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी 105 महिलांच्या बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात भयंकर बाब म्हणजे प्रत्येक दिवशी 17 महिलांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय स्तरावर बेपत्ता महिला आणि तस्करीच्या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सगळ्यात अव्वल आहे. यानंतर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालचा नंबर येतो. (Maharashtra unsafe for women Every day 105 girls go missing for prostitution)

2019 मध्ये तस्करीचा शिकार झालेल्या 989 घटनांमध्ये 88 टक्के महिला आणि 6 टक्के लहान मुलं होती. मजूरी, अवयव तस्करी, ड्रग पेडलिंग, लैंगिक शोषण, जबरदस्तीने लग्न करणं अशा इत्यादी कारणांसाठी मानवी तस्करी केली जात होती. महाराष्ट्राच्या बाबतीत, 95.6 तस्करीचं कारण जबरदस्ती वेश्याव्यवसायातून लैंगिक शोषण करणं हेच समोर आलं आहे.

या वर्षी 13 टक्के महिला बेपत्ता या व्यतिरिक्त 2019 आणि 2018 च्या आकडेवारीच्या तुलनेत बेपत्ता महिलांच्या घटनांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018 मध्ये सर्वाधिक बेपत्ता झालेल्या मुलांसह महाराष्ट्र पहिल्या 10 राज्यांच्या यादीत नव्हता. पण आता तब्बल 4,562 मुलं बेपत्ता झाल्यानंतर राज्य राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचलं आहे. यातही मुलांच्या आकडेवारीनुसार, यामध्ये 55 मुली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra unsafe for women Every day 105 girls go missing for prostitution)

सेक्स ट्रॅफिकिंग एक मोठी समस्या ज्या चमकत्या शहरांमध्ये राहण्याचं सगळ्यांना आकर्षण असतं अशा मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन महानगरांमध्ये रेड-लाइट क्षेत्राचं मोठं जाळं तयार होत आहे. राज्यात लैंगिक तस्करीची ही प्रमुख ठिकाणं बनली आहे. राज्यात या महानगरांना वगळता अनेक लहान शहरंदेखील सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये पुढे येत आहेत.

अपहरणाच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर… देशात अपहरण आणि अपहरणांच्या घटनांमध्ये ०.7 टक्क्यांची घट झाली असली तरी ही फार शुल्लक घट आहे. कारण, महाराष्ट्रात महिलांवरील गुन्हे मोठ्या प्रमाणात होत आहेत. उत्तर प्रदेशनंतर 2019 मध्ये महाराष्ट्रात अपहरणाची सर्वाधिक प्रकरणं समोर आली. मागच्या वर्षाच्या तुलनेत या घटनांमध्येही 1.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इतर बातम्या –

‘या’ तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
चोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात

(Maharashtra unsafe for women Every day 105 girls go missing for prostitution)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.