शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून आज (18 मे) अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने याबाबतचे वृत्त दिलं आहे. काही दिवसांपूर्वी 18 ते 19 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार आज अखेर पावसानं अंदमानात हजेरी लावली आहे. जवळपास 15 दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थिरावल्यानंतर […]

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून आज (18 मे) अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने याबाबतचे वृत्त दिलं आहे. काही दिवसांपूर्वी 18 ते 19 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार आज अखेर पावसानं अंदमानात हजेरी लावली आहे. जवळपास 15 दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थिरावल्यानंतर येत्या 6 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आली आहे.

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंदमान निकोबार बेटावर नैऋत्य मोसमी वारे वाहत आहे. त्याशिवाय या वाऱ्यांनी  अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालचा उपसागरही व्यापला आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत अंदमानात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतात सर्वात आधी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होतो. यंदा साधारण 20 मेच्या दरम्यान अंदमान, निकोबार बेटांवर मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र दोन दिवस आधीच मान्सून अंदमान निकोबार बेटांवर धडकला आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागराकडून मान्सूच्या वाऱ्यांची उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांकडे वाटचाल होते.

अंदमानमध्ये 18 मे रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर, 6 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात आहे. दरम्यान अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या : 

4 जूनला मान्सून केरळमध्ये, ‘स्कायमेट’चा अंदाज

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.