अनेक नेत्यांना मारहाण होते, त्यावर बोलायची इच्छा नाही : प्रकाश आंबेडकर

लातूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमध्ये झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यास भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिला आहे. “अशा अनेक नेत्यांना मारहाण होते, यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. माझ्यासाठी तो फार महत्त्वाचा मुद्दा नाही,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. लातूरमध्ये प्रकाश आंबेडकरांना यावर प्रश्न विचारण्यात आला. पण त्यांनी यावर एक अक्षरही बोलण्यास […]

अनेक नेत्यांना मारहाण होते, त्यावर बोलायची इच्छा नाही : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

लातूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमध्ये झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यास भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिला आहे. “अशा अनेक नेत्यांना मारहाण होते, यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. माझ्यासाठी तो फार महत्त्वाचा मुद्दा नाही,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लातूरमध्ये प्रकाश आंबेडकरांना यावर प्रश्न विचारण्यात आला. पण त्यांनी यावर एक अक्षरही बोलण्यास नकार दिला आणि बोलणं टाळलं.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शनिवारी रात्री अंबरनाथ येथे एका कार्यक्रमाला गेले असता, प्रविण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. विमको नाका परिसरात रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आठवले प्रमुख पाहुणे होते. यावेळी रामदास आठवले यांनी कार्यक्रमात भाषण केले. त्यानंतर ते स्टेजवरून खाली उतरून गाडीकडे जात असताना प्रविण गोसावी या तरुणाने त्यांना मारहाण केली. आठवलेंना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आठवलेंच्या समर्थकांनी पकडलं आणि चांगलाच चोप दिला.

कोण आहे प्रविण गोसावी?

या प्रकरणानंतर आरोपी प्रविण गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तो एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे. मात्र त्याने असे का केले, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

हल्ल्याचा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.