दोन्ही राजेंच्या उपस्थितीत नवी मुंबईत बुधवारी निर्णायक बैठक, अंतिम रणनीतीवर होणार फैसला

नवी मुंबईमध्ये 7 तारखेला मराठा समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

दोन्ही राजेंच्या उपस्थितीत नवी मुंबईत बुधवारी निर्णायक बैठक, अंतिम रणनीतीवर होणार फैसला
संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये 7 तारखेला मराठा समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. (Maratha reservation meeting will held on Wednesday Presence of Sambhajiraje And Udyanraje)

पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होत आहे. तुर्भेतल्या माथाडी भवनात ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता माथाडी भवनात ही बैठक पार पडणार आहे.

मराठा संघटनांच्या सर्व संघटना, प्रतिनिधींना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. समाजाच्या पुढील आंदोलनाची दिशा नेमकी काय असावी याबाबतीत या बैठकीत चर्चा होणार आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये  पुढाकार घ्यावा, असं मत संभाजीराजे यांनी मांडलंय.

संभाजीराजे यांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको, अशी भूमिका याअगोदर जाहीर केलीये. EWS आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

दुसरीकडे 3 ऑक्टोबर रोजी आमदार विनायक मेटे यांनी पुण्यात विचार मंथन बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे दोघांनीही दांडी मारली होती. मुळे मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मेटेंना बैठक उरकावी लागली होती.

(Maratha reservation meeting will held on Wednesday Presence of Sambhajiraje And Udyanraje)

संबंधित बातम्या

राज्यात जातीय विषमता वाढली, ‘शिवशाहू यात्रा’ काढणार; संभाजीराजेंची घोषणा

ना उदयनराजे, ना संभाजीराजे, मेटेंच्या मराठा विचार मंथन बैठकीला प्रमुख नेत्यांची दांडी 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI