निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांचा पुन्हा एल्गार?

निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांचा पुन्हा एल्गार?

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीला घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने परळीत आंदोलन करण्यात आलं होतं. यानंतर सरकारच्या मध्यस्थीने आश्वासन दिल्यानंतर ठोक मोर्चा आंदोलन मागे घेण्यात आलं. डिसेंबरअखेर मराठा समाजाला आरक्षण जाहीर करु, असे आश्वासन फडणवीस सरकारने दिलं होतं. मात्र याची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय.

मराठा आणि ओबीसी समाजाला घेऊन मुंबईत येत्या 20 तारखेला अतिमहत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. 20 तारखेनंतर भाजप सरकारला काय इशारा द्यायचा आहे. ते आम्ही लवकरच सांगू, असंही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. मराठा आणि ओबीसी समाज एकत्रित येत असल्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. हे मात्र निश्चितच म्हणावे लागेल, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आता येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार देतील काय याचं ही गुड कायम असून 20 तारखेला ही बैठक झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे पुढचे पाऊल स्पष्ट होणार आहे.

राज्यात सध्या वंचित बहुजन आघाडीची मोठी चर्चा आहे. मात्र खऱ्या अर्थाने राज्यातील मराठा आणि ओबीसी समाज वंचित आहे. त्यामुळे खरे वंचित आम्ही आहोत, असे आबा पाटील म्हणाले.

20 तारखेला अति महत्त्वाची बैठक संपल्यानंतर भाजप पुढे एक मोठे आव्हान उभे राहणार असल्याचंही आबा पाटील म्हणतात.. मात्र याचा फायदा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे 20 तारखेला होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होईल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा आणि ओबीसींची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आले या बैठकीतून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मराठा आणि ओबीसी या दोन समाजाच्या वतीने निवडणूक लढविण्यात येईल का, यावर मात्र बोलण्यास त्यांनी नकार दिला आणि 20 तारखेनंतर राज्यासमोर एक नवीन समीकरण मांडू, असंही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.


Published On - 9:37 am, Fri, 15 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI