Nivedita Saraf | प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

निवेदिता सराफ यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते.

Nivedita Saraf | प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 6:10 PM

मुंबई : खबरदारी घेत चित्रीकरण करत असतानाही आता मालिकांच्या सेटवर कोरोना विषाणूने शिरकाव केल्याचे चित्र आहे. झी मराठीच्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येते आहे. (Marathi Actress Nivedita Saraf tested Corona Positive)

निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचे ठरवले. 15 सप्टेंबर रोजी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले आहेत.

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत निवेदिता सराफ आसावरी राजेची भूमिका साकारतात. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. तर आसावरीच्या व्यक्तिरेखेलाही लोकप्रियता मिळाली आहे,

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणारे तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या सगळ्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मालिकांच्या सेटवर होणारा कोरोनाचा संसर्गाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.

आशालता वाबगावकर यांचे कोरोना संसर्गाने निधन

याआधी ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या सेटवर तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच मालिकेच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 22 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Marathi Actress Nivedita Saraf tested Corona Positive)

या प्रकरणानंतर सर्व निर्मिती संस्थांना मनसेने इशाराही दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार यांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन न करता मालिकांच्या सेटवर शूटिंग करत असल्याचे आढळून आल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने भरारी पथके स्थापन करणार असल्याचे सांगत सर्व निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा देत मनसेने परिपत्रक काढले होते. तसेच मनसेने देखील प्रोटोकॉलचे पालन करण्याबाबत हलगर्जीपणा करु नये, असा इशारा दिला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले तसेच मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हे परिपत्रक काढले आहे.

लॉकडाऊनच्या काळात कलाकार मंडळी, तंत्रज्ञ कामगार यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही दिवसांपूर्वीच शासनाने नियम अटी घालून शूटींगसाठी परवानगी दिली होती. मात्र अनेक शूटिंग्जच्या ठिकाणी तसेच काही निर्मात्यांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही, यासाठी निर्वाणीचा इशारा म्हणून हे परिपत्रक काढले गेले आहे, असे मेघराज राजेभोसले आणि अमेय खोपकर यांनी सांगितले.

कोव्हिड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते किंवा तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

आशालता ताईंच्या जाण्याने आमची 35 वर्षांची नाळ तुटली, अलका कुबल यांना शोक अनावर

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण

(Marathi Actress Nivedita Saraf tested Corona Positive)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.