मारुती मंदिरात मिलिंद एकबोटेंना मारहाण

मारुती मंदिरात मिलिंद एकबोटेंना मारहाण

पुणे : समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्यासह तिघांना मारहाण झाली आहे. सासवड येथील झेंडेवाडीच्या मारुती मंदिरात 40-50 जणांनी ही मारहाण केल्याचा आरोप एकबोटे यांनी केला. तसेच या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिलिंद एकबोटे आपल्या कार्यकर्त्यांसह सासवडला गेले होते. झेंडेवाडीला सिताराम महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमात पंडित मोडक आणि इतर 40-50 जणांनी मारहाण केल्याची तक्रार एकबोटे यांनी दिली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पंडित मोडक यांची गोशाळा आहे. याच गोशाळेच्या कारभारावर मिलिंद एकबोटे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच गोशाळेचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप केला होता. याचाच राग आल्याने गोशाळेचे प्रमुख पंडित मोडक यांच्यासह 40 ते 50 जणांची एकबोटे यांना मारहाण केल्याचा आरोप एकबोटे यांनी केला आहे.

दरम्यान, मिलिंद एकबोटे यांच्यावर भीमा कोरेगाव येथे दंगल भडकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे.

संबंधित बातम्या : 

‘भीमा कोरेगाव विजय दिन’ हाजी मस्ताननं सुरु केला : एकबोटे


Published On - 1:17 pm, Wed, 8 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI