हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचे तीन तेरा, मीरा भाईंदर पालिकेच्या दुर्लक्षाअभावी 22 हजार झाडं सुकली

मिरा भाईंदर महापालिकेच्या विविध आरक्षणावर 2 कोटी रुपये खर्च करुन लावण्यात आलेली झाडं सुकत चालली (mira bhayandar bmc tree plantation)  आहे.

हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचे तीन तेरा, मीरा भाईंदर पालिकेच्या दुर्लक्षाअभावी 22 हजार झाडं सुकली
Follow us
| Updated on: Jan 31, 2020 | 11:08 PM

ठाणे : मिरा भाईंदर महापालिकेच्या विविध आरक्षणावर 2 कोटी रुपये खर्च करुन लावण्यात आलेली झाडं सुकत चालली (mira bhayandar bmc tree plantation)  आहे. त्यात विविध प्रकारच्या एकूण 22 हजार 406 झाडांचा समावेश आहे. यामुळे अमृत वन योजनेतील हरित क्षेत्र विकास योजनांचा बोजवारा उडाला आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या दुर्लक्षाअभावी ही झाडं जास्त सुकली आहे, असा दावा अनेकांकडून केला जात आहे.

मीरा भाईंदर महानगर पालिकेकडील आरक्षण क्रमांक 196, 230, 256, 261, 273 आणि 335 या आरक्षणावर 2 कोटी रुपये खर्च करुन 22 हजार 406 झाडं लावण्यात आली होती. मात्र आता त्या ठिकाणची झाडे खतं, पाण्यावाचून सुकताना दिसत आहे. 2017-18 मध्ये केंद्र शासन पुरस्कृत योजनेचा एकंदरीत बोजवारा उडताना दिसून येत आहे. ही झाडे मुळात खरेदी करताना दोन मीटर उंचीपेक्षा जास्त उंचीचे खरेदी करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात असा दिसत नाही आहे. मनपाच्या निष्काळजीपणामुळे तसेच देखरेखच्या अभावी सर्व झाडे मरत आहेत.

मिरारोडमधील रामदेव पार्क परिसरातील आरक्षण क्रमांक 230 हा भूखंड हरित क्षेत्र विकास प्रकल्प योजनेकरता सन 2017-18 मध्ये आरक्षित करुन त्या ठिकाणी अमृत वन योजना राबवण्यात आली होती. त्याबाबत मनपामार्फत मीरा भाईंदर महानगरपलिकेचे नाव असलेला फलक देखील लावण्यात आला आहे. मात्र आता त्या ठिकाणी अमृतवन ऐवजी “सुखलेले वन” योजना पालिका राबवत असल्याचे दिसत आहे.

कारण गेल्या कित्येक महिन्यापासून त्या जागी पालिकेने झाडांना पाणी न दिल्याने झाड़े सुकून गेली आहेत. मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे. शासनाकडून या योजनेकरता दिला गेलेला निधी वाया जाताना दिसत  आहे.

मिरा भाईंदर मनपा आयुक्त बालाजी खतगावकर यांनी म्हटले की, एका ठिकाणीच्या झाड मेलेले आहे. बाकी सर्व ठिकाणी झाडे हिरवे आहेत. यांच्यात कुठल्याही प्रकारच्या झालेल्या नाही.

देशात पर्यावरण संरक्षणसाठी झाडे लावा झाडे जगवा अशी योजना राबविण्यात येत आहे. पण मिरा भाईंदर महानगरपालिकेत झाले लावा झाडे मारा असा चित्र दिसत (mira bhayandar bmc tree plantation)  आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.