उशीर झाल्यामुळे ट्रेन चुकली? पैसे परत मिळवण्यासाठी खास टिप्स

उशीर झाल्यामुळे ट्रेन चुकली? पैसे परत मिळवण्यासाठी खास टिप्स

मुंबई : अनेकदा प्रवाशी लांब पल्ल्यासाठी दोन रेल्वेच्या तिकीट बुक करतात. मात्र कधी कधी प्रवासादरम्यान पहिली ट्रेन लेट असल्याने प्रवाशाची दुसरी ट्रेन सुटते. यामुळे प्रवाशाला नाहक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे अनेकदा प्रवाशाला या तिकीटाचे रिफंडही मिळत नाही. मात्र आता प्रवाशांची पहिली ट्रेन उशीरा पोहोचल्यामुळे दुसरी ट्रेन चुकली, तर प्रवाशांना विमान प्रवासाप्रमाणे तिकीटाचे संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत.

पैसे परत मिळवण्यासाठी खास टिप्स

  • प्रवाशाची पहिली ट्रेन उशीरा आल्यामुळे दुसरी ट्रेन चुकली असेल, तर त्याला तीन तासाच्या आत तिकीटाचे प्रत तुमच्या सध्या असलेल्या स्थानकाच्या काऊंटर जमा करावी लागणार आहे.
  • तिकीट काऊंटरवर जमा केल्यानंतर तुम्हाला तीन दिवसाच्या आत तिकीट डिपॉझिटची पावती मिळेल. या पावतीद्वारे तुम्हाला तुमच्या तिकीटाचा पूर्ण रिफंड मिळू शकतो.
  • पण यासाठी प्रवाशाला पहिली ट्रेन उशीरा आल्यानंतर अवघ्या तीन तासात स्थानकाच्या तिकीट काऊंटरवर तिकीट जमा करावी लागणार आहे. मात्र तुम्ही तीन तासापेक्षा जास्त उशीर काऊंटरवर गेलात तर मात्र तुम्हाला तिकीटाचा रिफंड मिळणार आहे.

तिकीट रिफंडसाठी काही महत्त्वाची माहिती 

तिकीट रिफंडसाठी तुमच्या दोन्ही तिकीटावर तुमचं नाव, वय सारखं असणे गरजेचं आहे.

तिकीटचा रिफंड केवळ बोर्डिंग किंवा कनेक्टिंग स्टेशनला मिळू शकतो.

तिकीटावर तुम्ही प्रवास करणार असल्याचे पहिले स्टेशन आणि शेवटचे स्टेशन याची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे.

फर्स्ट क्लाससह इतर सर्व ई तिकीट आणि काऊंटर तिकींटावर रिफंडचा पर्याय उपलब्ध आहे.

दोन गाड्यांसाठी संयुक्त पीएनआर

रेल्वे प्रशासनामार्फत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवासासाठी एक विशिष्ट पीएनआर क्रमांक देण्यात येतो. पण लांब पल्ला गाठण्यासाठी कधी कधी प्रवाशांना दोन रेल्वे बदलाव्या लागतात. या दोन्ही रेल्वे गाड्यांसाठी मिळणारे पीएनआर वेगवेगळे असतात. त्यामुळे कित्येक प्रवाशांची चुकामूक होते. हे टाळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 1 मे पासून दोन रेल्वे प्रवासाकरिता एक संयुक्त पीएनआर दिला जात आहे. रेल्वे प्रशासनाला तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशाला पैसे परत करणेही सोपे जावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI