वसईच्या पूर्व पट्ट्यातील भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार द्या: राजेश पाटील

जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजाराची मदत शासनाने करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. (MLA Rajesh Patil demands fifty thousand rupee compensation per hector to farmers )

वसईच्या पूर्व पट्ट्यातील भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार द्या: राजेश पाटील

वसई: अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेले भात पीक उध्वस्त झाले आहे. काढणीच्या वेळीच पाऊस पडल्याने भात पीक आडवे होऊन त्यातील भाताचे नुकसान झाले आहे. वसई पूर्व शिरवली या गावातील शेतीच्या बांधावर जाऊन बोइसरचे आमदार राजेश पाटील यांनी नुकसानाची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजाराची मदत शासनाने करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. (MLA Rajesh Patil demands fifty thousand rupee compensation per hector to farmers )

वसई तालुक्यात बाराशेहून अधिक हेक्टर जमीन भात शेतीखाली आहे. दुसऱ्या जिल्ह्यात अनेक नेतेमंडळी शेतीचा दौरा करण्यासाठी जात आहेत मात्र वसईसह पालघर जिल्ह्यात फिरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते.परंतु, विरार येथील शिरवली भागात आमदार राजेश पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार बळीराम जाधव,ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील.शेतकरी उपस्थित होते.

पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे भाताचं उत्पादन तर गेलं आहे परंतु पेंढाही उपयोगी येणार नाही. शेतीची लागवड करण्यासाठी मजुरी, खत, बी-बियाणे सारीच मेहनत पाण्यात गेली आहे. या संकटात शेतकरी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. आता खायचं काय?, कसं जगायचं? असा प्रश्न त्यांच्या समोर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी केली आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

सिबील गेलं खड्ड्यात, अधिकार वापरुन शेतकऱ्यांना कर्ज द्या, कुंभारवाडीतून संभाजीराजेंचा बँक अधिकाऱ्यांना फोन

(MLA Rajesh Patil demands fifty thousand rupee compensation per hector to farmers )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI