राज ठाकरेही सरसावले, कसबा पोटनिवडणूक लढवणारच, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग,मनसेचा उमेदवार कोण?

पुण्यात कसबा पेठ येथील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

राज ठाकरेही सरसावले, कसबा पोटनिवडणूक लढवणारच, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग,मनसेचा उमेदवार कोण?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 4:55 PM

अभिजित पोते, पुणेः विधान परिषद निवडणुकांनंतर (MLC Election) आता पुण्यातील पोट निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलंय. पुण्यातील घडामोडींना प्रचंड वेग आलाय. कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीत (By Election) भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. तर याच निवडणुकीत मनसेदेखील मैदानात उतरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे उद्यापासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. कसबा पेठ निवडणुकीत मनसेचा उमेदवार कोण असेल, यावर या दौऱ्यात चर्चा होईल. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

सोमवारी राज ठाकरे पुण्यात..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच शहर कार्यकारणी यांनी तयार केलेली इच्छुकांची यादी राज ठाकरे तपासतील. हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन मनसे कसबा विधानसभा जिंकू शकता, असा विश्वास राज ठाकरे यांनी दर्शवला आहे.

मनसेचा उमेदवार कोण?

पुण्यातील शहर कार्यकारिणीकडून राज ठाकरे यांच्याकडे काही नावं गेली आहेत. मनसे कार्यकर्त्यांपैकी गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर आणि निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे अशी कसबा पोटनिवडणुकीसाठी पुढे आली आहेत. यापैकीच एकाच्या नावावर राज ठाकरे यांच्याकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून कोण?

पुण्यात कसबा पेठ येथील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त झाली आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या ठिकाणी हेमंत रासणे यांना तिकिट देण्याची तयारी भाजपने केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज तशी घोषणा केली.

मविआकडून कोण?

महाविकास आघाडीनेही कसब्यातील उमेदवार निश्चित केला आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालाय.

चिंचवडमधून कोण कोण?

तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली आहे. येथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी देण्याचं निश्चित केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते राहुव कलाटे यांना मविआने उमेदवारी दिली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.