मोदी सरकारच्या नव्या निर्णयामुळे जुना पासपोर्ट रद्दीत जाणार

मोदी सरकारच्या नव्या निर्णयामुळे जुना पासपोर्ट रद्दीत जाणार

नवी दिल्ली : कुठल्याही परदेशी प्रवासासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट. मात्र, आता तुमचे हे सर्व जुने पासपोर्ट रद्दीत जाणार आहेत. कारण या ठिकाणी तुम्हाला नवे पासपोर्ट काढावे लागतील. केंद्रातील मोदी सरकार येत्या नव्या वर्षात नव्या रुपातील पासपोर्ट देणार आहे. या पासपोर्टमध्ये अॅडव्हान्स सिक्युरिटी सिस्टम असणारी चिप असेल. या चिपमध्ये पासपोर्ट अर्जदाराची सर्व माहिती असेल. […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : कुठल्याही परदेशी प्रवासासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट. मात्र, आता तुमचे हे सर्व जुने पासपोर्ट रद्दीत जाणार आहेत. कारण या ठिकाणी तुम्हाला नवे पासपोर्ट काढावे लागतील. केंद्रातील मोदी सरकार येत्या नव्या वर्षात नव्या रुपातील पासपोर्ट देणार आहे. या पासपोर्टमध्ये अॅडव्हान्स सिक्युरिटी सिस्टम असणारी चिप असेल. या चिपमध्ये पासपोर्ट अर्जदाराची सर्व माहिती असेल. या नव्या पासपोर्टची पेपर क्वालिटी आणि प्रिटिंग सुद्धा हायटेक असेल.

इथे बनेल ई-पासपोर्ट

चिप असणारे ई-पासपोर्ट नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये (ISP) बनवले जातील. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने (ICAO) आयएसपी चिप असणाऱ्या पासपोर्टच्या ऑपरेटिंग सिस्टम घेण्यासाठी निविदा देण्याची अनुमती दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-पासपोर्ट बनवण्याचे काम सुरु केले जाईल. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांच्या माहितीनुसार, सरकारने ई-पासपोर्टच्या निर्मितीला परवानगी दिली आहे.

एका चिपमध्ये असणार सर्व माहिती

ई-पासपोर्टमध्ये लावल्या जाणाऱ्या चिपमध्ये अर्जदाराची सर्व माहिती समाविष्ट असेल. यासाठी बायोमेट्रिक डेटा आणि डिजीटल साईन चिपमध्ये स्टोअर केले जाईल. विशेष म्हणजे, प्रवास करत असताना तुमची सर्व माहिती एअरपोर्ट सिस्टममध्ये दिसेल. जर ई-पासपोर्टच्या चिपसोबत कुणी छेडाछाड केली, तरी ते त्वरीत पासपोर्ट सर्व्हिस सिस्टमला त्यासंदर्भात अलर्ट मेसेज जाईल. त्यानंतर पासपोर्ट ऑथेंटिकेशन पूर्ण होणार नाही. परदेशातील सर्व दूतावास ई-पासपोर्टला जोडण्यात येतील. अमेरिका आणि ब्रिटनमधील भारतीय दूतावासांना अशाप्रकारे जोडण्यात आले आहे.

ई-पासपोर्ट बनवण्यास किती दिवस लागतील?

सर्वसामान्यपणे पासपोर्ट बनवण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा अवधी लागतो. मात्र, चिप असणाऱ्या नव्या ई-पासपोर्टला बनवण्याची प्रक्रिया कमी दिवसात पूर्ण होईल. अर्ज केल्यानंतर केवळ 7 दिवसात पासपोर्ट तयार होईल. पासपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाने परवानगी दिल्यानंतर पासपोर्टही तुमच्या हातात येईल. नवीन पासपोर्ट मिळाल्यानंतर तुमचा जुना पासपोर्ट रद्द केला जाईल.

या देशांमध्ये ई-पासपोर्ट

भारतात ई-पासपोर्ट प्रणाली आता येऊ घातली आहे, मात्र अमेरिका, इटली, जर्मनी, जपान, युरोपीयन देश, हाँगकाँग, इंडोनेशिया यांसह जवळपास 86 देशांमध्ये ई-पासपोर्ट प्रणाली अंमलात आणली गेली आहे. भारताआधी शेजारी पाकिस्तानातही ई-पासपोर्ट लागू करण्यात आला आहे. भारतात पुढल्या वर्षी म्हणजे 2019 पर्यंत ई-पासपोर्ट जारी केला जाईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें