मान्सून तळकोकणात आला, मराठवाड्याला 23-24 ला झोडपणार

दुष्काळी मराठवाड्यात 23 आणि 24 जून रोजी जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळेल.

मान्सून तळकोकणात आला, मराठवाड्याला 23-24 ला झोडपणार

मुंबई : आज येणार उद्या येणार म्हणता म्हणता प्रचंड वाट पाहायला लावणारा मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकणात मान्सून दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टी परिसरात पाऊस बरसत आहे. येत्या तीन दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे येत्या आठवडाभरात राज्यात जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यातल्या त्यात दुष्काळी मराठवाड्यात 23 आणि 24 जून रोजी जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळेल.

दरम्यान, स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनेही येत्या 24 ते 48 तासात दक्षिण कोकण, गोव्यात पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे.

येत्या दोन दिवसात मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल. मुंबईलाही पाऊस झोडपून काढेल असा अंदाज हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला.

आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील.  29 जूनपर्यंत दमदार सरी कोसळतील. मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात 23 आणि 24 जून रोजी जोरात पाऊस होईल. तर उत्तर महाराष्ट्रातही नाशिक, धुळे, जळगाव या भागात पाऊस बरसेल, असं रामचंद्र साबळे यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं. याशिवाय विदर्भात 21-22 जूनला पावसाचा अंदाज आहे.

महत्त्वाचं म्हणजे 22 ते 27 जून म्हणजेच पाच दिवसात राज्यात तब्बल शंभर टक्के पाऊस पडेल. विशेषत: पुण्यात या पाच-सहा दिवसात चांगला पाऊस पडेल. धरणातील पाणी साठा वाढू शकतो, असाही अंदाज आहे.

संबंधित बातम्या 

राज्यात 22 ते 27 जूनदरम्यान शंभर टक्के पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज  

पाऊस आल्यावर लाईट का जाते आणि महावितरणला कसं समजतं?

Published On - 12:23 pm, Thu, 20 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI