मुंबईतील प्रसिद्ध गिर्यारोहकाचा कोकण कड्यावरुन पडून मृत्यू

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत (60) यांचा हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावरुन पडून मृत्यू झाला (arun sawant died) आहे.

मुंबईतील प्रसिद्ध गिर्यारोहकाचा कोकण कड्यावरुन पडून मृत्यू

पिंपरी-चिंचवड : प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत (60) यांचा हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावरुन पडून मृत्यू झाला (arun sawant died) आहे. अरुण सावंत हे काल (18 जानेवारी) शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरु होता. या शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाला त्यांचा मृतदेह सापडला.

अरुण सावंत हे गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक होते. त्यांना सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जायचे. अरुण सावंत यांच्यासह 30 गिर्यारोहक हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरील मोहिमेत सहभागी झाले होते. सावंत हे या मोहिमेचे प्रमुख (arun sawant died) होते.

या मोहिमेचे नेतृत्व करत असताना शनिवारी संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते. रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता. या मोहिमेतील इतर 29 जण हे टप्पा उतरुनही आले होते. सावंत हे दोराच्या साह्यानं रॅपलिंग करत असताना बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता.

यानंतर स्थानिक आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीनं त्यांचा शोध सुरु होता. आज (19 जानेवारी) अखेर त्यांचा मृतदेह सापडला. तो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान रोप फिक्सिंग करताना हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सावंत यांच्या मृत्यूमुळे गिर्यारोहकांवर शोककळा पसरली (arun sawant died) आहे.